अमरावती : शहरातील झोपडपट्टी, मागासवर्गीय वस्त्यांमधील वीजबिल थकीतपोटी वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी निवासी उपजिल्हधिकारी नितीन व्यवहारे यांच्याकडे करण्यात आली आहे. शेगाव परिसरातील नागरिकांनी अमोल इंगळे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले.
------------------
माजी कृषिमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा (फोटो आहे)
अमरावती : एमपीएससी परीक्षा विद्यार्थी आंदोलनात माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी पोलिसांना सरकारचे कुत्रे, अशी अर्वाच्च भाषा वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर भादंविच्या ३५३ अन्वये गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भीम ब्रिगेडच्यावतीने पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे केली आहे. यावेळी राजेश वानखडे, अशोक नंदागवळी, प्रवीण मोहोड, विक्रम तसरे आदी उपस्थित होते.
-------------------
१३ तालुक्यांत क्रीडा अधिकारी पदे रिक्त
अमरावती : जिल्ह्यात १३ क्रीडा अधिकारी पदे रिक्त असून, ते तत्काळ भरण्यासाठी पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी क्रीडा प्रेमींनी केली आहे. क्रीडा अधिकारी पदे रिक्त असल्यामुळे नियोजन होण्यास अडथळा येत असल्याची ओरड आहे.
-------------------
गार्डन, उद्याने उघडण्याची प्रतीक्षा
अमरावती : संचारबंदीमुळे गार्डन,उद्याने उघडण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे सकाळी ९ ते ४ वाजतादरम्यान संचारबंदीत शिथिलता असून, अन्य वेळेत दुकाने, आस्थापना बंद आहे. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गार्डन, उद्याने उघडण्याचे वेध लागले आहे.