शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र महिमापूरला ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:13 IST

८७ वर्षांची परंपरा, १९३३ साली रामचंद्र महाराज ठाकरे यांच्याकडून प्रारंभ नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील श्रीक्षेत्र महिमापूर येथे ८७ वर्षांपासून ...

८७ वर्षांची परंपरा, १९३३ साली रामचंद्र महाराज ठाकरे यांच्याकडून प्रारंभ

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील श्रीक्षेत्र महिमापूर येथे ८७ वर्षांपासून ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळ्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. मात्र, यंदा येथील यात्रा कोरोनामुळे रोडावली.

जंगलात हनुमंताचे हे मंदिर आहे. सन १९३३ पासून गुरुवर्य हभप रामचंद्र महाराज ठाकरे नागपूरकर यांनी तेथे २१ दिवसांच्या ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या उपक्रमास सुरुवात केली होती. त्यांच्या निधनानंतर भाऊसाहेब वरोलीकर, अमृत महाराज कहाळे यांनी ही परंपरा सुरू ठेवली. सन १९९५ ला गणेशराव काकडे, ज्ञानेश्वरराव खेडकर, प्रल्हादराव बोदडे यांनी तेथे सोहळ्याचे आयोजन केले होते. बऱ्याच भाविकांनी या मंदिरात हजेरी लावली होती. वडाखालची यात्रा म्हणूनही नंतर पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली.

हनुमंताचे येथील पुरातन मंदिर चांदी प्रकल्पाच्या पाण्याने वेढले गेल्याने, मारुतीरायाच्या मूर्तीची २०१२ ला बाजूस उंच टेकडीवर धरणाच्या काठावर मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळ्यात या क्षेत्राच्या आजूबाजूच्या गावात दर रविवारी विठ्ठलाचा नामजप व प्रवचन आयोजित केले जाते व त्याची समाप्ती महिमापूर येथे केले जाते. तालुक्यातील मुंडवाडा, पळसमंडळ, धर्मापूर, रोहना, गौरखेडा, खंडाळा, वाढोणा रामनाथ, पिंपळगाव निपाणी, पिंपरी बोदडे, शिरपूर, सावंगा, नांदसावंगी, धानोरा गुरव, कोदोरी मारूफ, वाघोली, जावरा, नांदगाव खंडेश्वर आदी गावांतील भाविकांची येथे हजेरी लाभली असते. नुकताच या ठिकाणी ज्ञानेश्वरी प्रवचन सोहळा पार पडला. त्यात शंकर महाराज झंझाट, हभप ज्ञानेश्वर महाराज इंगळे, सोपानकाका कुचे, पवन महाराज खोडे, नितीन महाराज मेणे, शंकर महाराज तिडके, मुरलीधर महाराज बोधडे, छत्रपती आप्पा केसरखाने, पुरुषोत्तम महाराज मोरे, भीमराव मोरे, ज्ञानेश्‍वर चौधरी, पुरुषोत्तम महाराज बोबडे, शिरूभाऊ खेडकर, हिंमतराव पाडर, सुशीम काकडे, ओंकारराव शेठे, मंगेश महाराज काळे, बबनराव इंगळे यांनी या सप्ताहात महत्त्वपूर्ण योगदान दिले.