लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी उत्सवात नोकरी, व्यवसाय किंवा रोजगारासाठी बाहेरगावी असलेल्यांना घरी जाण्याची लगबग सुरू होते. यंदा दिवाळी उत्सवादरम्यान आरक्षण खिडक्यांवर ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकू लागले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी दिवाळी असली तरी २५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग’ही नाही, अशी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे अनेकांनी दिवाळीत घर गाठण्यासाठी रेल्वेच्या आरक्षणासाठी दलालांकडे धाव घेण्यास प्रारंभ केला आहे.हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाचे अन्ययसाधारण महत्त्व आहे. घरापासून लांब असलेली कोणतीही व्यक्ती दिवाळी सण हा कुंटुबीयांसह साजरा करण्यासाठी येतात. यंदा दिवाळी ७ नोव्हेंबर रोजी आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात आरक्षण मिळत नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. दिल्ली, मुंबई, चैन्नई, अहमदाबाद, पुणे, हावडा आदी मार्गावर ये-जा करणाऱ्या गाड्यांमध्ये २५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण नाही, असे रेल्वे खिडक्यांवर फलक झळकत आहेत. परिणामी दिवाळीत घरी जाण्याची ओढ असलेल्या अनेक जणांच्या आनंदावर विजरण आले आहे. मुंबई, पुणे येथून बाहेरगावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी असून, हावडा, दिल्ली, चैन्नई, अहमदाबाद मार्गे जाण्यासाठी अनेक रेल्वे स्थानकावरून आरक्षणासाठी मागणी होत आहे. रेल्वे खिडक्यावर आरक्षण नाही. रेल्वे तिकीट दलालांनी काही महिन्यांपूर्वीच दिवाळी उत्सव ‘कॅश’ करण्यासाठी आरक्षण करून ठेवल्याची माहिती आहे. त्यामुळे वेळेवर रेल्वेचे आरक्षण घेणाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.या रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नाहीमुंबई-गोंंदिया विदर्भ एक्सप्रेस, अमरावती- मुंबई अंबा एक्सप्रेस, हावडा-मुंबई गीतांजली आणि मेल, हावडा-अहमदाबाद सुपर डिलक्स एक्स्प्रेस, भुसावळ-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, हावडा-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस, कुर्ला-हावडा एक्सप्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, अहमदाबाद-चैन्नई नवजीवन एक्स्प्रेस आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.दिवाळीत रेल्वे गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल आहे. यात पुणे, मुंबई मार्गावरील गाड्यांची सर्वाधिक मागणी आहे. महिन्यापूर्वीच आरक्षण झाले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नोव्हेंबर अखेरनंतरच आरक्षण मिळेल.- आर.टी. कोटांगळेस्टेशन प्रबंधक
दिवाळीत रेल्वे गाड्या ‘हाऊसफुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:16 IST
दिवाळी उत्सवात नोकरी, व्यवसाय किंवा रोजगारासाठी बाहेरगावी असलेल्यांना घरी जाण्याची लगबग सुरू होते. यंदा दिवाळी उत्सवादरम्यान आरक्षण खिडक्यांवर ‘हाऊसफुल्ल’चे फलक झळकू लागले आहेत. ७ नोव्हेंबर रोजी दिवाळी असली तरी २५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेचे आरक्षण ‘वेटिंग’ही नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
दिवाळीत रेल्वे गाड्या ‘हाऊसफुल्ल’
ठळक मुद्दे‘नो रूम’ : मुंबई, पुणे, हावडा, अहमदाबाद मार्गे २५ नोव्हेंबरपर्यंत ‘वेटिंग’ही नाही