शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
4
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
5
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
6
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
7
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
8
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
9
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
10
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
11
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
12
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
13
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
15
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
16
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
17
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
18
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
19
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
20
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

दिवाळी आटोपली; चाकरमान्यांना परतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:32 IST

दिवाळी उत्सव घरी आप्तस्वकीयांसह साजरा केल्यानंतर पुणे-मुंबईकडे कामाला असलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतरच्या पहिल्या सोमवारी कर्तव्यावर रुजू व्हावयाचे असल्याने अमरावतीतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली.

ठळक मुद्देकर्तव्यावर रुजू होण्याची घाई : रेल्वे, खासगी बसद्वारे प्रवासाला पसंती; पुणे, मुंबईचे तिकीट ‘हाऊसफुल्ल’

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी उत्सव घरी आप्तस्वकीयांसह साजरा केल्यानंतर पुणे-मुंबईकडे कामाला असलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. दिवाळीनंतरच्या पहिल्या सोमवारी कर्तव्यावर रुजू व्हावयाचे असल्याने अमरावतीतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी दिसून आली. मात्र, ११ नोव्हेंबर रोजी रेल्वे, खासगी बसचे आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे काहींनी ‘वेटिंग’वर प्रवासाला नाखुषीने पसंती दिली.नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे, रोजगारासाठी बाहेरगावी असलेले अमरावतीकर दरवर्षी दिवाळीत घर गाठतात. दोन-चार दिवस कुटुंबीयांसह दिवाळीचा उत्सव साजरा केल्यानंतर पुन्हा कर्तव्यावर जाण्याचे वेध त्यांना लागले होते. त्यामुळे रविवारी बहुतांश लोकांनी परतीचा प्रवास सुरू केला.दरम्यान, यंदा दिवाळीत रेल्वे गाड्या ३० नोव्हेंबरपर्यंत हाऊसफुल्ल आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे अनेकांनी आरक्षण मिळाले नसले तरी ‘वेटिंग’ तिकीट घेऊनच प्रवास केल्याची माहिती आहे. रविवारी नागपूर येथून मुंबई, पुणे मार्गे जाणाºया सायंकाळच्या ट्रॅव्हर्ल्स हाऊसफुल्ल होत्या. एकही सीट रिकामी नव्हती, असे एका खासगी बस संचालकाने सांगितले. सण-उत्सवाच्या काळात महिनाभरापासूनच मुंबई-पुण्याचे रेल्वे, बसचे बूकिंग होते. त्यामुळे अनेकांनी जादा पैसे मोजण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना तिकीट मिळाले नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, गोंदिया- सीएसटी विदर्भ एक्स्प्रेसमध्ये रविवारी तुफान गर्दी होती. मुंबईमार्गे जाणाºया या दोन्ही गाड्यांच्या साधारण डब्यातही पाय ठेवायला जागा नव्हती. प्रत्येक प्रवाशाला कर्तव्यावर रुजू होण्याची घाई दिसून आली. नागपूर- पुणे गरीब रथ, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसमध्येही तुफान गर्दी होती. रेल्वे आणि खासगी बसमध्ये चाकरमान्यांचीच गर्दी असल्याचे दिसून आले. दिवाळीसाठी ६ किंवा ७ नोव्हेंबर रोजी कसेबसे घर गाठले. त्यामुळे परतीचा प्रवास तूर्तास एकट्याने करीत काही कुटुंबप्रमुखांनी नोकरीवर रुजू होण्याकरिता बस स्थानक गाठले. शाळा-महाविद्यालयीन मुले असलेल्या कुटुंबांचा मात्र गर्दी झेलत प्रवास करण्याचा नाइलाज आहे.रेल्वे गाड्या ३० पर्यंत हाऊसफुल्लमुंबई, पुणे मार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत आरक्षण नसल्याचे फलक झळकत आहेत. कोणत्याही रेल्वे गाडीचे आरक्षण स्टेटस बघितले, तर ‘नो रूम’ असे प्रकर्षाने दिसून येते. दिवाळीनंतर त्वरेने कर्तव्यावर रुजू व्हायचे असल्याने अनेकांनी रेल्वेऐवजी ट्रॅव्हल्सने प्रवासाला पसंती दिली. मात्र, खासगी बस संचालकांकडे पुणे, मुंबईकरिता बूकिंग फुल्ल असल्याचे फलक झळकले आहेत. त्यामुळे अनेकांना जादा पैसे मोजूनच परतीचा प्रवास करावा लागला.दिवाळीसाठी घरी अमरावतीला येताना झालेला प्रवास थकवा देणारा होता. आता पुण्यात परत जाताना तीच कसरत करावी लागणार का, ही चिंता सतावत होती. सोमवारी परत जाणे निकडीचे होते. त्यामुळे पुणेकरिता रविवारी खासगी बससाठी दोन हजार रुपये मोजावे लागले.- सुजित श्रृंगारे, सावंतवाडी, पुणे.