शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘दिवाळी पहाट’च्या सुरात न्हाले रसिक श्रोते

By admin | Updated: October 25, 2014 22:33 IST

‘लोकमत’ सखी मंच, हॉटेल रंगोेली पर्ल आणि नेताजी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’या संगीतमय मैफलीला रसिक श्रोत्यांचा

अमरावती : ‘लोकमत’ सखी मंच, हॉटेल रंगोेली पर्ल आणि नेताजी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’या संगीतमय मैफलीला रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रूक्मिणीनगर येथील नेताजी क्रीडा मंडळाचे मैदान रिमझिम पावसाच्या सरींमध्येदेखील रसिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. ‘लोकमत सखी मंच’द्वारे यावेळी शेकडो दिव्यांची नेत्रदीपक आरास करण्यात आली होती. या तेजोमय प्रकाशात प्रेक्षकांनी या सुरेल संगीत मैफलीचा आनंद लुटला. कार्यक्रमात गायकांनी भावगीत, सुगम संगीत, भैरवी राग, सुफी, गजल अशा विविध प्रकारातील गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायक सेबी जेम्स यांच्या सुरेल गळ्यातून उमटलेल्या ‘गगन सदन तेजोमय..’ गीताने या रंगतदार कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर एका पेक्षा एक सरस गीते सादर होऊ लागली. रसिक श्रोत्यांनी या गीतांवर अक्षरश: ताल धरला. अनुजा घाटगे हिने सादर केलेल्या सुफी गाण्याला व गजÞलेला भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘होश वालों को खबर क्या...बेखुदी क्या चिज है..’ या सुरेल गजलेने वातावरण भारावून गेले. शास्त्रीय संगीत व भैरवी रागाची जुगलबंदी प्रेक्षकांना मोहवून गेली. ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आ. सुनील देशमुख, मनपा आयुक्त अरूण डोंगरे सपत्निक उपस्थित होते. तसेच नेताजी मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख, श्रीकांत देशमुख उपस्थित होते. सेबी जेम्स या गायकाने गायिलेल्या ‘लागा चुनरी में दाग..’ या गीताला श्रोत्यांकडून ‘वन्स मोअर’ मिळाला. अनुजा घाटगे हिने कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन केले. तन्मय चाफले, निधी इंगोले यांनी प्रस्तुत केलेली लावणी उत्कृष्ट ठरली. या लावणीला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी रसिकांनी टाळ्या देऊन निधी इंगळे यांना वन्स मोर म्हणून गायनाला उत्तेजित केले. या लावणीने रसिकांची मने जिंकली. अमरावती येथील गायक भूषण रायबोले यांनी ‘मोरया.. मोरया..’ व ‘राधा ही बावरी’ ही गाणी प्रस्तुत करून वातावरण आल्हाददायक करून टाकले. की-पॅडवर रामेश्वर काळे, आॅक्टोेपॅडवर राजेश लकडे, तबल्यावर विशाल पांडे, गिटारवर मनीष पाटील यांनी साथ दिली. कार्यक्रमासाठी लोकमतचे जयंत कौलगीकर, अपूर्व डाखोडे, शीतल चौहान व लोकमतच्या सखींनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाला रुक्मिणीनगर परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. सुमधूर गीतांच्या सादरीकरणाने श्रोते भारावून गेले होते.