शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

घटस्फोटित जावयाकडून सासरा, साळ्याची भोसकून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:15 IST

चांदूर बाजार : तारुण्यसुलभ वयात प्रेमदिवाने झालेले जोडपे विवाहबद्ध झाले. मात्र, प्रेमाचा बहर ओसरताच त्याच्याकडून तिला दररोज मारहाण असायची. ...

चांदूर बाजार : तारुण्यसुलभ वयात प्रेमदिवाने झालेले जोडपे विवाहबद्ध झाले. मात्र, प्रेमाचा बहर ओसरताच त्याच्याकडून तिला दररोज मारहाण असायची. त्याला कंटाळून पित्याने तिला आपल्या पंखाखाली संरक्षण दिले. मात्र, हा निर्णय घातक ठरला. जावयाने तिच्या पित्यासह भावाला चाकूच्या वाराने संपविले. आजोबादेखील चाकुहल्ल्यात गंभीर जखमी झाले. तालुक्यातील कुरळपूर्णा येथे ही घटना ‘व्हॅलेंटाईन डे’ला घडली.

पोलीस सूत्रांनुसार, रवि सुरेश पर्वतकर (२३, रा. महावीर काॅलनी अमरावती) असे मारेकरी जावयाचे नाव आहे. त्याने बंडू विश्वनाथ साबळे व धनंजय बंडू साबळे या दोघांचा खून केला. मूळचे कुरळपूर्णा येथील साबळे कुटुंब अमरावती येथे शिवशक्तीनगरात वास्तव्यास होते, तर बंडू यांचे वडील विश्वनाथ व आई वच्छला या गावी राहत होत्या. त्यांची मुलगी हर्षा हिचा दोन वर्षांपूर्वी रविशी प्रेमविवाह झाला होता. या नातेसंबंधातील बहर ओसरल्यानंतर एक वर्षापासून रवि हा हर्षाला मारहाण करीत होता. त्यामुळे अधूनमधून माहेरी परतणार्या हर्षाला २७ नोव्हेंबर २०२० रोजी समझोतानाम्यावर घटस्फोट देऊन बंडू साबळे यांनी कायमचे घरी आणले. शिवशक्तीनगरात राहत असताना रवि हा तिचा पिच्छा पुरवायचा. त्यामुळे ७ फेब्रुवारी रोजी ती आजोबा विश्वनाथ साबळे यांच्याकडे कुरळपूर्णा येथे वास्तव्यास आली. १४ नोव्हेंबर रोजी हर्षानेच रवि हा कुरळपूर्णा येथे आला व संसार पुन्हा थाटण्याबाबत जबरी करीत असल्याचे बंडू यांना फोनवर कळविले. बंडू व धनंजय यांनी साडेसात वाजता कुरळपूर्णा गाठले. यावेळी विश्वनाथ साबळे, वच्छला साबळे व हर्षा घराच्या अंगणात होते.

चवताळलेल्या रविने चाकूने तिघांनाही भोसकल्यानंतर पत्नीला जबरीने घेऊन पलायन केले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे बंडू व धनंजय यांना मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी चांदूर बाजार पोलिसांनी रवि पर्वतकरविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३०७, ३६४ अन्वये गुन्हा नोंदविला. पसार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपी कुणालाही आढळल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------

तू रविसोबत जाऊ नको

हर्षाला चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण होत असल्याचे माहिती असल्याने बंडू साबळे यांनी तिला रविसोबत जाऊ नको, असे सांगितले. तोच समाजमंदिराच्या बाजूने रवि धारदार चाकू घेऊन तेथे आला. तुम्ही अडविणारे कोण, असे त्याने दरडावले आणि बंडू साबळे यांच्या डोक्यात चाकूने प्राणघातक वार केला. त्याक्षणी ते खाली कोसळले. यानंतर धनंजयच्या पोटात चाकू भोसकला. तोदेखील रक्तबंबाळ झाला.

-------------

दुचाकीने पळविले पत्नीला

रविने विश्वनाथ साबळे यांच्यावरही चाकूचा वार केला. त्यामुळे तेदेखील खाली कोसळले. यानंतर रविने हर्षाला जबरीने दुचाकी (एएमच २७- बीयू-१८६६) वर बसवून पलायन केले.