शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षुब्ध मनाचा...नि:शब्द हुंकार

By admin | Updated: September 18, 2016 00:11 IST

गुरुवार २२ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा प्रक्षुब्ध मनाचा ...नि:शब्द हुंकार ठरणार आहे.

मराठा क्र ांती मोर्चा : आज नियोजन बैठकअमरावती : गुरुवार २२ सप्टेंबरचा मराठा क्रांती मोर्चा प्रक्षुब्ध मनाचा ...नि:शब्द हुंकार ठरणार आहे. सकाळी ११ वाजता नेहरू मैदानातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. त्याअनुषंगाने शेवटची नियोजन बैठक रविवार १८ सप्टेंबरला होऊ घातली आहे. नागपूर मार्गावरील गौरी ईन या हॉटेलमध्ये ही बैठक होईल. यात केवळ नियोजनाशी संबंधित असलेला मराठा बांधव सहभागी होतील.कोपर्डी येथील घटनेतील गुन्हेगारांना मरेपर्यंत फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा निर्णय त्वरित घेण्यात यावा, मराठा समाजातील विद्यार्थ्यांकरिता जिल्हा स्तरावर स्वतंत्र वसतिगृहे व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात यावीत, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्याकरिता आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला त्वरित शासकीय मदत अणि शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, शेतमालाला योग्य तो भाव देऊन बहुसंख्येने शेतकरी असलेल्या समाजाला न्याय देण्यासाठी हा मराठा क्रांती मूकमोर्चा काढला जात आहे. या मोर्चात जिल्ह्यातून सुमारे एक ते दीड लाख मराठे एकत्र येत असल्याचा अंदाज आहे. या भव्य मोर्चाच्या सूक्ष्म नियोजनासाठी रविवारी शेवटची बैठक होत आहे.मराठा क्रांती मोर्चासाठी तालुक्यात नियोजनचांदूररेल्वे : कोपर्डी येथे झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात २२ सप्टेंबर रोजी अमरावती येथे निघणाऱ्या विशाल मूकमोर्चातसहभागी होण्यासाठी तालुक्यातील मराठा समाज एकवटत आहे. त्यासाठी बांधणी सुरू आहे, अधिकाधिक समाज बांधव मोर्चात सहभागी व्हावे यासाठी रविवारी शहरात मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी तालुक्यातून २० हजारांवर मराठा समाज जमणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले, त्यासाठी शुक्रवारी स्थानिक शेतकरी भवनात बैठक घेण्यात आली. सदर मोर्चा कुठल्याही जातीच्या, समाजाविरुद्ध नसून, हा मराठा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी व्यवस्थेकडे होणारा आक्रोश आहे, मोर्चात सर्व कुटुंबीयांनी हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तिवस्यात मराठा मोर्चासंबंधी कार्यालयाचे उद्घाटनतिवसा : मराठा क्रांती मूकमोर्चा अमरावती येथे २२ सप्टेंबरला निघणार आहे. यासंदर्भात मराठा बांधवांना संवाद साधण्यासाठी तिवसा येथे मराठा क्रांती मूक मोर्चा कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. पंचायत समितीजवळील एका व्यापारी संकुलमध्ये हे कार्यालय आहे. या कार्यालयात राजमाता जिजाऊ यांच्या मुर्तीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून गौरी नामक एका मराठा तरुणीच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.