शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात नकोच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 20:23 IST

शासनाने राज्यात राबविण्यात येणाºया सर्व योजना व जिल्हा विकास निधीत ३० टक्के कपात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात करू नये अशी मागणी होत आहे. 

अमरावती : शासनाने राज्यात राबविण्यात येणाºया सर्व योजना व जिल्हा विकास निधीत ३० टक्के कपात केली आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकासासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीत कपात करू नये अशी मागणी होत आहे. शेतकºयांना शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच जीएसटी लागू झाल्यानंतर एलबीटीसह अन्य कर रद्द  झाले. त्यामुळे  स्थानिक स्वराज्य संस्थांचे नुकसान झाले. परिणामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह  स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासन यासाठी नुकसानभरपाई देत आहे. शासनाच्या तिजोरीवर हा भार पडणार असल्याने जिल्हा नियोजन समितीसह राज्यातील सर्वयोजनांच्या निधीत कपात केली आहे. यामध्ये महसुली योजनेत ३० टक्के, तर भांडवली योजनेत २० टक्के कपात करण्यात आली आहे. जिल्ह्यात राबविणाºया योजनामध्ये १० टक्के निधी हा जिल्हा नियोजन समितीमधील असतो, तर ९० टक्के निधी हा राज्य शासनाचा असतो. शासनाने या योजना राबविताना मात्र ३० व २० टक्के निधी कपातीचा निर्णय घेतला आहे.  या निधीत कपात करू नये, अशी मागणी जिल्हा नियोजन समिती सदस्यांकडून होत आहे. यामुळे अनेक योजनामध्ये खीळ बसणार आहे. काही आमदारांनीही शासनाने विकासात्मक कामात कुठलाही निधी कपात न करता सर्व योजनासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.

भाजप शासनाने २७ डिसेंबर २०१५ रोजी अमरावती जिल्ह्यात ९ हजार ७०० कोटींचे रस्ते विकासाचे भूमिपूजन केले. त्यापैकी अवघे ५० कोटी देण्यात आले. शेतकरी कर्जमाफी केली; मात्र शेतकºयांना फायदा झाला नाही. त्यात आता विकासनिधीतही कपात करून आडकाठी आणली आहे. त्यामुळे कुठल्याही निधी कपात करू नये- वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव रेल्वे