शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती लोकसभेच्या जागेवर जिल्हा काँग्रेसचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 22:20 IST

लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेसचा ठराव : अंतिम निर्णयाचा चेंडू प्रदेश काँग्रेसच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा ठराव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बुधवारी पारित झाला.जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर अध्यक्षांची मते यावेळी जाणून घेण्यात आली. अमरावती लोकसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला सोडल्यास पक्षाचा खासदार निवडून आणण्याचा दावा करीत जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत एकमताने ठराव पारित करण्यात आला.जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे सरसकट जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. मूग, उडीद खरेदीसाठी शासकीय खरेदी केंदे्र त्वरित सुरू करावी, शेतकऱ्यांचे थकलेले तुरीचे चुकारे विनाविलंब द्यावे आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या ‘शक्ती’ अ‍ॅपबाबत आढावा तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्याबाबत तालुका व शहराध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी सूचना दिल्या. तालुका पातळीवर काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात आलेल्या आंदोलने व पूर्वतयारीचा आढावा जिल्हाध्यक्षांनी घेतला. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणीचे गठण त्वरित करण्याचे निर्देश दिले. बैठकीला तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, महेंद्रसिंह गैलवार, श्रीकांत झोडपे, श्रीधर काळे, प्रदीप वाघ, दीपक सवई, मिश्रीलाल झारखंडे, प्रमोद दाळू, बाबाराव बहुरूपी, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख, राजेश मांगलेकर, ईश्वर बुंदेले, रवि हिरूळकर, हसन खान पठाण, राजा पाटील यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.प्रदेश काँग्रेसकडे मागणीअमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राखली नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ही जागा आता काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी, असा प्रस्ताव महेंद्र गैलवार यांनी मांडला. त्याला सुधाकर भारसाकळे यांनी अनुमोदन दिले. ठराव बहुमताने मंजूर करून अंतिम निर्णयासाठी प्रदेश काँग्रेसकडे पाठविला जाणार असल्याचे बबलू देशमुख म्हणाले.