शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिवीर वापराच्या अनियमिततेचा जिल्हा समिती घेणार शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 05:00 IST

कोविड रुग्णालयातील अटेंडन्ट, महावीर हॉस्पिटलमधील अटेंडन्ट, ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील डॉक्टर, इर्विन रुग्णालयातील स्टाॅफ नर्स, संजीवनी कोविड सेंटरचे डॉक्टर, लॅब असिस्टंट अशा सहा आरोपींना पकडून त्यांच्याजवळून १० रेमडेसिवीर जप्त केले आहे. सर्व आरोपी हे शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांशी संबंधित आहे. या इंजेक्शनच्या वापरात अनियमितता कशी झाली, याचा शोध समिती घेणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, पाच सदस्यीय समिती गठित, सात दिवसांत अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात रेमडेसिविरच्या वापरात अनियमितता झाळी असून, ती शोधण्यासोबतच अनियमितता कशी रोखता येईल व दोषींवर प्रस्तावित कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुरुवारी पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली. ही समिती सात दिवसांत अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. कोरोना रुग्णांसाठी सध्या वरदान ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी बुधवारी भंडाफोड केला. यामध्ये कोविड रुग्णालयातील अटेंडन्ट, महावीर हॉस्पिटलमधील अटेंडन्ट, ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील डॉक्टर, इर्विन रुग्णालयातील स्टाॅफ नर्स, संजीवनी कोविड सेंटरचे डॉक्टर, लॅब असिस्टंट अशा सहा आरोपींना पकडून त्यांच्याजवळून १० रेमडेसिवीर जप्त केले आहे. सर्व आरोपी हे शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांशी संबंधित आहे. या इंजेक्शनच्या वापरात अनियमितता कशी झाली, याचा शोध समिती घेणार आहे.त्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांनीदेखील चार सदस्यीय समिती गठित केलेली आहे. यात निवासी वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व दोन आरोग्य कमर्चारी यांचा समावेश आहे. ही समिती सर्व कोविड रुग्णालयांतील कागदपत्रांची तपासणी करुन रेमेडेसिवीरच्या वापराची अनियमितता शोधणार आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हा समिती पुन्हा चौकशी करून अनियमितेत दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा अहवाल सात दिवसांत जिल्हाधिकारी यांना सादर करणार आहे. सलग शासकीय सुट्या आल्याने समिती सदस्यांनी अद्याप कामकाजाला सुरुवात केली नसल्याचे दिसून आले.

अशी आहे जिल्हा समितीरेमडेसिविरच्या वापरात अनियमितता आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाच सदस्यीय समिती गठित केली आहे. यात उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, एफडीएचे औषधी निरीक्षक मनीष गोतमारे व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक सुनील वाठोरे यांचा समावेश आहे.

रेमडेसिविरच्या वापराचे ऑडिट करण्यासाठी आरएमओ यांच्या नेतृत्वात चार सदस्यीय समिती गठित करण्यात आलेली आहे, ही समिती दोन दिवसांत ऑडिट रिपोर्ट सादर करेल.- श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस