अमरावती : शासनाच्या निर्णया विरोधात अनेक सावकार व संघटनांनी नागपूर उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. या याचिकेचा निर्णय २५ आॅगस्ट २०१५ ला झाला. त्या अनुषंंगाने सहकार विभागाद्वारा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्यात. तहसीलदारांकडे कर्जदारांपैकी शेतकरी असल्याची खात्री करण्यासाठी व ७/१२ धारक असलेल्या कुटुंबियांची ओळख पटविण्यात आली. त्यानुसार ८ हजार ३०२ शेतकरी सावकारी कर्जदार असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हास्तरीय समितीच्या ५ बैठकी आयोजित करण्यात आल्यात. यामध्ये जिल्ह्यातील ८१५ गावांमधील १६७ सावकाराकडे ५ हजार ५२ शेतकऱ्यांनी मुद्दल १० कोटी १६ लाख ५८ हजार व व्याज १ कोटी ३३ लाख १४ हजार असे ११ कोटी ४९ लाख ७१ हजार रुपयांचे प्रस्ताव सादर केले. यापैकी ३६ प्रस्ताव जिल्हा समितीने नाकारले व १० कोटी ११ लाख २६ हजार रुपये मुद्दल व १ कोटी ३१ लाख ९१ हजारांचे व्याज असे ११ कोटी ४३ लाख १६ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रकमेचा आता शासन भरणा करणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा समितीने ३६ प्रस्ताव नाकारले
By admin | Updated: December 16, 2015 00:19 IST