शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

सहा बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:57 IST

शासन मदतनिधीमधून कोणतीही कर्जकपात करू नये, असे शासनादेश आहेत. मात्र, आदेश अव्हेरून कर्जकपात करणाऱ्या सहा बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आपणाविरूद्ध आयपीसीचे कलम १८८ प्रमाणे फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली.

ठळक मुद्दे-अन्यथा एफआयआर : शासन मदतनिधीतून कर्जकपात करणे महागात पडणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासन मदतनिधीमधून कोणतीही कर्जकपात करू नये, असे शासनादेश आहेत. मात्र, आदेश अव्हेरून कर्जकपात करणाऱ्या सहा बँक व्यवस्थापकांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आपणाविरूद्ध आयपीसीचे कलम १८८ प्रमाणे फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावली. समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करा, अन्यथा एकतर्फी कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली.शेतकरी हितासाठी राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी न करणाºया बँकांविरुद्ध धडक कारवाई करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. गारपीट, बोंडअळीचा निधी, पीकविम्याची भरपाई आदींसाठी शासनाने मदतनिधी उपलब्ध केला व या मदतनिधीतून बँकांनी कोणतीही कर्जकपात करू नये, याविषयी शासनादेश जारी केला आहे. याच विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ५ मे रोजी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांच्यामार्फत सर्व बँकांना पत्र देऊन निर्देश दिलेत. मात्र, जिल्ह्यातील बँकांनी शासन आदेश अव्हेरून मदतनिधीमधून शेतकऱ्यांच्या खात्यामधून कर्जकपात करणे सुरू केले. जिल्हा बँकर्सच्या आढावा सभेत जिल्हाधिकाºयांनी याविषयी पुन्हा तंबी दिल्यानंतरही काही बँकांनी कर्जकपात केली. यासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित बँका व्यवस्थापकांना आता जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावल्या आहेत.यामध्ये चांदूर बाजार तालुक्यातील करजगावच्या सेंट्रल बँक आॅफ इंडिया, आसेगाव पूर्णा येथील इंडियन बँक, दर्यापूर तालुक्यातील आमला व मोर्शी शहरातील येथील स्टेट बँक आॅफ इंडिया, अमरावती येथील बियाणी चौकस्थित बँक आॅफ इंडिया, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विचोरी येथील जिल्हा मध्यवती बँक शाखेच्या व्यवस्थापकांना नोटीस देऊन समक्ष उपस्थित राहून खुलासा करण्याविषयी सदर नोटिशीत सांगण्यात आले आहे. अन्यथा एकतर्फी कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकाºयांनी दिली आहे.‘पीएनबी’च्या मॅनेजरविरुद्ध गुन्हापीकविम्याचे भरपाईमधून कर्जकपात केल्याबद्दल परतवाडा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध भादंवि. १८८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हाधिकाºयांचे आदेशावरून तहसीलदारांनी फिर्याद नोंदविली. जवंजाळ यांच्या तक्रारीनुसार बँकेच्या व्यवस्थापकाला नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला होता. मात्र बँकेच्या व्यवस्थापकांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयानी सांगितले.कळमगव्हाण एसबीआयने केली रक्कम परतदर्यापूर तालुक्यातील कळमगव्हाण येथील शेतकरी पुंडलिक विठ्ठलराव बायस्कर यांच्या खात्यामधून स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेने कर्जकपात केली. याविषयी त्यांनी आ. रमेश बुंदेले यांच्यासह जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. यावर जिल्हाधिकाºयांनी नोटीस बजावताच संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात कर्जकपात केलेली रक्कम पुन्हा जमा करण्यात आल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कळविले आहे.पीककर्जासाठी ही कागदपत्रे आवश्यकजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सर्व बँकांची पीक कर्जाची आढावा बैठक पार पडली. यावेळी पीककर्जासाठी आवश्यक कागदपत्राची सर्वानुमते निश्चिती करण्यात आली. सात-बारा, आठ-अ, आधार कार्ड, दोन फोटो सर्व बँॅकासाठी अनिवार्य असण्यावर शिक्कामोर्तब झाले.व्यापारी बँकांसाठी फेरफार, लीगल सर्च रिपोर्ट (१ लाखावरील कर्जासाठी) ना देय प्रमाणपत्र आवश्यक नाही. त्याऐवजी स्टॅम्प पेपरवरील शपथपत्र ग्राह्य, तलाठी यांनी दिलेला हात नकाशा व १ लाखांवरील कर्जासाठी दुय्यम निबंधकांकडे नोंदणीकृत केलेले गहाणखताचे घोषणापत्र आवश्यक आहे.जिल्हा बँकेसाठी फेरफार, ना देय प्रमाणपत्र ५० हजारांपर्यंत आवश्यक नाही. त्यावरील रकमेसाठी कार्यक्षेत्रातील बँकांचे ना देय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. तसेच गटसचिव व तलाठ्यांच्या स्वाक्षरीने ई-करार आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.