यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना पावसातील खंड काळामध्ये पिके जगवण्यासाठी उगवण होऊन वाढीच्या अवस्थेमध्ये असलेल्या पिकाच्या ठिकाणी हलकी डवरणी करावी जेणेकरून जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहील, सिंचनाची सोय असलेल्या ठिकाणी स्प्रिंकलरने सायंकाळी वा सकाळी हलके ओलीत करावे, जिथे सिंचन सुविधा नाही तेथे लहान क्षेत्रावर पाठीवरील पंपाचे नोझल ढिले करून सकाळी वा सायंकाळी पिकाच्या ओळीत पाणी फवारणी करून पिके वाचवता येऊ शकतात, असा संदेश दिला.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून सोयाबीन पिकावरील कीड व रोग, यावरील उपाययोजनांबाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी तालुक्यातील पीक पेरणी व पीक परिस्थितीची माहिती दिली. यावेळी शेतकरी बांधव व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
060721\img-20210706-wa0007.jpg
जिल्हा कृषी अधिकारी यांनी केली शिवारात पीक परिस्थितीची पाहणी.