गजानन मोहोड ल्ल अमरावतीअमरावती व नागपूर विभागात २३ मार्च २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे ११,८६२ गावांमध्ये दुष्काळस्थिती घोषित करून प्रचलित ५ सोयी-सवलती लागू केल्यात. केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या १३ मे २०१५ च्या निर्णयान्वये दुष्काळनिधीची आवश्यकता असताना जिल्ह्यात २ मार्च २०१५ च्या निर्णयानुसार सोयाबीन व कापूस पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पीक विम्याच्या निकषानुसार मदतनिधी वाटपासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करणे सुरू आहे. दुष्काळ निधीसंदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे सध्या दुष्काळ मदतीसाठी जिल्हा प्रशासनात संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने २३ मार्च २०१५ च्या निर्णयानुसार शुक्रवार १ एप्रिल रोजी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या अमरावती विभागातील ५,८१० गावांत व नागपूर विभागातील ६,०५२ अशा एकूण ११,८६२ गावांमध्ये दुष्काळजन्य स्थिती घोषित केली व ५ प्रकारच्या सोयी-सवलती जाहीर केल्यात. दुष्काळी गावांना १३ मे २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (एनडीआरएफ /एसडीआरएफ) निकषांच्या धर्तीवर व केंद्राच्या ८ एप्रिल २०१५ च्या पत्रान्वये सन २०१५ ते २०२० या कालावधीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर सुनिश्चित केले आहेत. यांची अंमलबजावणी शासनाने १ एप्रिल २०१५ पासून केली आहे.या निकषानुसार मदतनिधी निर्णयाची शक्यता आहे. याविषयी शासनाच्या मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने २ मार्च २०१६ च्या निर्णयाप्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या बनविणे सुरू केले आहे. प्रत्यक्षात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या गावांत सोयाबीन व कापूस पिकांना पीकविमा योजनेच्या निकषाप्रमाणे मदत वाटपाचा निर्णय दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याच्या पूर्वीचा असल्याने तो दुष्काळस्थिती जाहीर झाल्यावर रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना नसल्याने सध्या जिल्हा प्रशासनात याविषयी संभ्रम कायम आहे.असे आहेत २ मार्च २०१६ चे निकष४अमरावती- नागपूर जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस पीकविमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक योजनेनुसार मदत देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीकविमा योजनेच्या मंडळनिहाय जाहीर रकमेच्या ५० टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे.असे आहेत १३ मे २०१५ चे निकष४कोरडवाहू क्षेत्रासाठी ६८०० रुपये प्रती हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत. ४आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्राकरिता १३,५०० रुपये प्रतीहेक्टर४कमीतकमी अनुज्ञेय मदत १ हजार रुपयांपेक्षा कमी नसावी.-तर २ मार्चचा निर्णय होणार रद्द ४अमरावती व नागपूर विभागात दुष्काळस्थिती २३ मार्चला जाहीर करण्यात आली. त्यापूर्वी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असणाऱ्या अमरावती व नागपूर विभागातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस पिकाची नुकसानीची मदत मिळावी म्हणून शासनाने २ मार्च २०१६ च्या निर्णयान्वये मदत देण्यासाठी निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात या दोन्ही विभागात २३ मार्च २०१६ रोजी दुष्काळस्थिती घोषित केल्याने यापूर्वीचा २ मार्च २०१६ चा शासन निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. शासनाने २३ मार्च रोजी जिल्ह्यातील १,९६७ गावात दुष्काळस्थिती व ५ सोयी-सवलती जाहीर केल्या आहेत. तसेच यापूर्वीच्या २ मार्चच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी याद्या बनविणे सुरू आहे. दुष्काळनिधीसंदर्भात सध्या मार्गदर्शक सूचना नाहीत. - शंकर शिरसुध्दे, उपजिल्हाधिकारी, महसूल
दुष्काळ निधीबाबत जिल्हा प्रशासन संभ्रमात
By admin | Updated: April 5, 2016 03:06 IST