शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:12 IST

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ; आवश्यक उपचार सुविधा अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था ...

पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ; आवश्यक उपचार सुविधा

अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणा काटेकोर प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना गती देत आता जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचा प्रारंभ शुक्रवारी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे हस्ते व जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा आमले, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, सीईओ अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले आदींच्या उपस्थित करण्यात आला.

जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व शिक्षक, कर्मचारी संघटनाच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये १४ कक्षात २० बेड उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले. यापुढे आणखी १० बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून तातडीच्या वेळी कोरोना रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. या केंद्रात रुग्णांच्या वैद्यकीय उपचार व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, तीन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन परिचारिका कार्यरत राहणार आहेत. दीड वर्षापासून शासन व प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे व कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे नागरिकांना आवाहन ना.ठाकूर यांनी केले.

बॉक्स

म्युकरमायकोसिस आजाराची जनजागृती

जिल्ह्यात कोविड आजारातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपचार करण्यासाठी उपचार यंत्रणा उभारण्याबरोबरच जाणीवजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार करण्यापेक्षा तत्काळ वैद्यकीय तपासणी व उपचार घ्यावा. वेळीच उपचार केला, तर यातून पूर्णपणे बरे होता येते, असेही पालमंत्री म्हणाले.