शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनागोंदी कारभारावर नाराजी मुख्याधिकाऱ्यांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:01 IST

सुरुवातीलाच कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन का घेतले नाही? सदर काम संरक्षण भिंतीचे असून, ७२ लाखांचे आहे. मी कामासाठी पैसे दिले. त्यामुळे मला का विचारले नाही, असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला. अधीक्षक संजय संतोषवारसह अधिकारी व कर्मचारी राजकारण करीत असल्याचा आक्षेप पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला तिवसा नगरपंचायतचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवसा नगरपंचायत कार्यालयाचा कारभार पार ढेपाळला असल्याने शनिवारी नगरपंचायत कार्यालयात सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली.  मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना पालकमंत्र्यांनी चांगलेच फटकारले. शहरात विविध समस्या असल्याने त्या निकाली निघत नाही. गढूळ पाणीपुरवठा होतो. त्यावर उपाययोजना का करत नाही, असा संतप्त सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित  केला. सुरुवातीलाच कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या विकासकामांचे भूमिपूजन का घेतले नाही? सदर काम संरक्षण भिंतीचे असून, ७२ लाखांचे आहे. मी कामासाठी पैसे दिले. त्यामुळे मला का विचारले नाही, असा संतप्त सवाल ठाकूर यांनी केला. अधीक्षक संजय संतोषवारसह अधिकारी व कर्मचारी राजकारण करीत असल्याचा आक्षेप पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. येथील माहिती बाहेर जातेच कशी? त्यामुळे अधीक्षक संतोषवार यांना तात्काळ निलंबित करा, असा आदेश पालकमंत्री ठाकूर यांनी मुख्याधिकारी सोटे यांना दिले. तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहे. शहरात स्वच्छता का नाही, असा सवाल उपस्थित केला. तिवसा नगरपंचायतीवर प्रशासक आहे. त्यांच्याकडून वाऱ्यावर कारभार चालत असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी कारभाराचे वाभाडे काढले. एकंदर या संपूर्ण आढावा बैठकीत यशोमती ठाकूर येथील कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी नरेंद्र फुलझेले, तहसीलदार वैभव फरतारे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने उपस्थित होते.

प्रथम पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देशतिवसा शहरात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पालकमंत्री ठाकूर यांच्यासमोर महिलांनी व्यथा मांडली. कोट्यवधींचा निधी नगरपंचायतीला आहे. त्यामुळे आधी पाण्याला प्राधान्य द्या, असा दम ना. यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिला.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर