शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

निधीवाटपाचा वाद विभागीय आयुक्तांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 22:16 IST

जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या नियोजनावर विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांच्यासह नऊ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : विरोधी पक्षाच्या सदस्यांची पुन्हा तक्रार

आॅनलाईन लोकमतअमरावती: जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या नियोजनावर विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे यांच्यासह नऊ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या कोर्टात हा तिढा पोहोचल्याने पुन्हा झेडपीतील विकासकामांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता वाढली आहे.तक्रारीनुसार शासनाच्या नियमाप्रमाणे विविध लेखाशीर्षाखाली प्राप्त होणाºया निधीचे झेडपी सर्कल निहाय समन्यायी वाटप व सदस्यांनी सुचविलेली कामे समाविष्ट करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेतील ठराव क्र. २४ चे स्वउत्पन्न व वाढीव उपकराचे सन २०१६-१७ अखेर २ कोटी व जिल्हा परिषद गुंतवणुकीतून व्याजाद्वारा ३.५० कोटी असे एकूण ५.५० कोटींमधून २५-१५, १०१-२७ या लेखाशीर्ष (लोकोपयोगी लहान कामे व योजना सन २०१७-१८) च्या नियोजनाचा ठराव सर्वसाधारण सभेत सत्ताधाºयांनी मांडला. यामधून रस्ते व अन्य विकासकामांचे सताधाºयांनी नियोजन केले. मात्र, नियोजन करताना शासन निर्णयानुसार प्रत्येकी २० टक्के समाजकल्याण, पाणीपुरवठा व १० टक्के निधी हा महिला व बाल कल्याण आणि ३ टक्के दिव्यांगांसाठी राखीव ठेवून ५.५० कोटींतून ५३ टक्के निधी राखीव ठेवणे आवश्यक होते. त्यानुसार २ कोटी ९१ लाख ५ हजार रुपयांच्या योजना मंजूर कराव्या लागतात व उर्वरित २ कोटी ७० लाखांचे नियोजन करून ५९ सर्कलमध्ये समसमान वाटप करणे आवश्यक असल्याचे विरोधी पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. मात्र, सत्तापक्षाने कुठल्याही बाबीचा विचार न करता सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी सुचविलेल्या कामाच्या दीडपट नियोजनाऐवजी दुप्पट १० कोटी ९० लाख रुपयांचे नियोजन केले आहे. यावर रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे, प्रवीण तायडे, शरद मोहोड, प्रताप अभ्यंकर अशा नऊ सदस्यांनी नियोजनावर आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात विभागी आयुक्त यांनी झेडपीला विविध लेखाशीर्षाखाली प्राप्त निधी, सदस्यांनी सुचविलेली कामे व सर्कलनिहाय मंजूर कामे व निधीच्या नियोजनाबाबतची इत्थंभूत माहिती मागविली आहे. त्यामुळे झेडपी सत्तापक्षाने केलेले नियोजन अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे नियोजन व निधीवाटपात सदस्यांना समान न्याय मिळावा व त्याप्रमाणेच समन्यायिक निधी वाटप करावा. त्यानुसार प्रत्येक सर्कलचा समसमान विकास करण्याची आमची मागणी आहे.- रवींद्र मुंदे,विरोधी पक्षनेताउपलब्ध निधीतून केलेल्या विकासकामांचे नियोजन करताना समान न्यायानुसार नियोजन केले आहे. त्यात कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे.- नितीन गोंडाणे,अध्यक्ष