शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतीच्या मृतदेहाची जाळून विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:04 IST

अमरावतीतील थरारक घटना : पोलीस प्रियकराच्या कृत्याचा नऊ महिन्यांनी उलगडा

अमरावती/परतवाडा : पोलीस कर्मचारी असलेल्या प्रियकराने गर्भवती मुलीचे अपहरण व हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना जुलै २०१७ मध्ये अचलपूर तालुक्यातील सुलतानपुरा परिसरात घडली होती. आरोपींच्या केलेल्या चौकशीत रविवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळावरून काही पुरावे ताब्यात घेतले आहेत. ९ जुलै २०१७ रोजी पुरुषोत्तम पोचगे (रा. अमरावती) यांनी मुलगी माधुरी हरविल्याबाबत गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी अमित सोमेश्वर अकाशे आणि मोहित अकाशे यांनी गर्भवती माधुरीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याचा आरोप पोचगेयांनी केला होता. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना शनिवारी अटक केली. त्यांना २५ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीतील चौकशीदरम्यान आरोपींनी मुलीच्या हत्येची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.त्यानंतर सुलतानपुरा परिसरातील भांडेगोंडे शिवारात ज्या विहिरीत आरोपींनी माधुरीचा मृतदेह जाळून टाकला होता. तेथे खोदकाम करून पोलिसांनी रविवारी राखेचे काही नमुने ताब्यात घेतले. माधुरीच्या वडिलांनी मुलगी हरविल्याची तक्रार केल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली होती. गेल्या नऊ महिन्यांपासून पोलीस विविध पद्धतीने चौकशी करीत होते.विहिरीत चिता रचून मृतदेह जाळला९ एप्रिल २०१७ रोजी अमित, त्याचा भाऊ मोहित व माधुरी हे तिघेही कारने अचलपूरला जाण्यासाठी निघाले. गर्भवती असल्यामुळे माधुरी लग्नाचा तगादा लावत होती, तर पैसे घेऊन बाजूला होण्यासाठी अमित तिच्यावर दबाव टाकत होता. यातून रात्री ८ ते ९च्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. त्यात अमितने तिची गळा आवळून हत्या केली आणि भांडेगोंडे शिवारातील विहिरीत तिचा मृतदेह टाकला. दुसऱ्या दिवशी अमित व मोहित यांनी तेथे येऊन विहिरीत चिता रचून मृतदेह जाळून टाकला आणि ११ जुलै रोजी दोघांनी राख गोळा करून बैतुल येथील एका नदीत टाकली.

टॅग्स :Crimeगुन्हा