शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अभियंत्याच्या कक्षात तोडफोड

By admin | Updated: July 5, 2014 23:19 IST

गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंताच्या कक्षात एका कंत्राटदाराच्या सुपरवायझरने तोडफोड केल्याने खळबळ उडाली होती.

आरोपी पसार : सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळअमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंताच्या कक्षात एका कंत्राटदाराच्या सुपरवायझरने तोडफोड केल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी खंडेलवाल कन्स्ट्रक्शनचे सुपरवायझर रोहित देशमुख (रा.साईनगर) व एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वलगाव येथील रोडच्या कामाचा कत्रांट खंडेलवाल कन्स्ट्रक्शनला दिले आहे. काही दिवसांपूर्वी त्या रोडचे काम पूर्ण झाल्याने त्या रोडचे बिल काढण्याकरिता शनिवारी दुपारी २ वाजता सुपरवायझर रोहित देशमुख व त्यांचे एक साथीदार सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता एस.पी. देशमुख यांच्या कक्षात गेले. यावेळी रोडच्या कामात हयगय झाल्यावरुन एस.पी. देशमुख व रितेश देशमुख यांच्यामध्ये वादविवाद झाले. या वादातून रोहित देशमुख व त्यांच्या साथीदाराने उपविभागीय अभिंयता एस.पी. देशमुख यांच्या कक्षाची तोडफोड करणे सुरु केले. यामध्ये त्यांच्या कक्षातील टेबलावरील काचा, दार व शोकेसची तोडफोड केली. वाद वाढत असल्याचे पाहून याबाबत गाडगेनगर पोलिसांना सूचना देण्यात आल्या. त्यामुळे रोहित देशमुख व त्यांच्या साथीदारांनी तेथून पलायन केले. काही वेळात पोलिसांनी पाचारण करुन काजी यांच्या कक्षाची पाहणी करुन पंचनामा केला व आरोपीविरुध्द भादंविच्या कलम १८६, ४५२, ४२७ व प्रॉपर्टी डॅमेज अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय चव्हाण करीत आहे.