तज्ञ्जांची बैठक : ९ ते १२ मीटरपर्यंत रस्ता अनिवार्य करण्याचा सूरअमरावती : शहरात चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) लागू करण्यासंदर्भात बुधवारी महापौरांच्या कक्षात वास्तुशिल्पकार, बांधकाम व्यावसायिक, अभियांत्रिकी आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली. एफएसआय लागू करताना सामान्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. नव्याने अभिन्यास मंजूर करताना ९ ते १२ मिटरचे रस्ते निर्माण करण्याची अट लादण्याचे ठरविण्यात आले.महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता अविनाश मार्डीकर, प्रकाश बनसोड, गुंफाबाई मेश्राम, अजय गोंडाणे, शहर सुधार समिती सभापती भूषण बनसोड, दिगंबर डहाके, प्रदीप दंदे, वसंतराव साऊरकर, दिनेश बूब, प्रशांत वानखडे, चेतन पवार, सुनील काळे आदी उपस्थित होते. गत महिन्यात पार पडलेल्या विशेष सभेत याविषयी कोणताही निर्णय झाला नव्हता. काँग्रेसचे जेष्ठ सदस्य वसंतराव साऊरकर यांनी एफएसआय लागू करण्यापूर्वी तज्ञ्जांचे मार्गदर्शन घेऊन यातील उणिवा, दोष दूर केल्यानंतरच हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी सूचना मांडली होती. त्यानुसार तज्ज्ञांच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
‘एफएसआय’ दर निश्चितीवर चर्चा
By admin | Updated: June 4, 2015 00:16 IST