शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

आठवडी बाजारातील व्यापारी वर्गांत असंतोष

By admin | Updated: July 26, 2015 00:45 IST

दोन महिन्यांपूर्वी एक ठराव घेऊन नगरपालिकेने आठवडी बाजारातील न.प. संकुलातील २०० पेक्षा अधिक भाडेकरु व्यापाऱ्यांना थकबाकी भरून दुकाने रिकामी करण्याच्या नोटीस दिल्या आहेत.

अंजनगाव सुर्जी : दोन महिन्यांपूर्वी एक ठराव घेऊन नगरपालिकेने आठवडी बाजारातील न.प. संकुलातील २०० पेक्षा अधिक भाडेकरु व्यापाऱ्यांना थकबाकी भरून दुकाने रिकामी करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. पण, एकदा व्यवसाय स्थिरावल्यावर नियम, अटी, शर्ती लागू करुन तो व्यवसाय अस्थिर करण्यापेक्षा त्यावर योग्य तोडगा काढावा, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नेमके हेच सूत्र लक्षात घेऊन १५ ते २० वर्षांपासून व्यवसायात स्थिरावलेल्या आठवडी बाजारातील नगरपरिषद व्यापार संकुलाच्या भाडेकरू व्यापाऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. परंतु अवाजवी भाडेवाढीची आणि भाडेवाढ मान्य नसल्यास दुकाने रिकामी करण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने या व्यापाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे त्यांच्या भावना संतप्त झाल्या आहेत. यामुळे संकुलातील सर्व व्यापारी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. मागील २० वर्षांपासून हे व्यापारी येथे भाड्याने दुकाने घेऊन व्यवसाय करीत आहेत. त्यांनी या काळात न.प.च्या वेगवेगळ्या राजकीय राजवटी अनुभवल्या आहेत. पण, यावेळी मिळालेली ‘शॉक ट्रिटमेंट’ त्यांना अपेक्षित नव्हती. येथील व्यापारी नगरपालिकेच्या उत्पन्नाचे अखंड स्त्रोत आहेत. नगरपालिकेला उत्पन्न महत्त्वाचे की, गाळे रिकामे करुन त्यांचा नव्याने लिलाव करुन दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या ताब्यात ही दुकाने देणे महत्त्वाचे आहे, हे विचारपूर्वक ठरविले गेले पाहिजे. आहे ती घडी विस्कटून या प्रकरणात अस्थैर्य व गोंधळ निर्माण करणे राजकीय हिताचे नाही. सुमारे २५० व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवून नगरपरिषदेच्या कार्यवाहीचा निषेध केला.व्यापारी प्रत्येक नगरसेवकाच्या, अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या घरी जातात. त्यांना आपली बाजू समजावून सांगतात. तरी या प्रश्नावर तोडगा काढला जात नाही. भाडेवाढीचा प्रश्न तांत्रिक असून विचारविनिमय करून आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यावर निर्णय होऊ शकतो. हा निव्वळ राजकीय विषय नसून नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा विषय आहे. त्यामुळे पालिका पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाची वाट बघत बसण्यापेक्षा मुख्याधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत घेऊन यावर प्रशासकीय तोडगा काढणे आवश्यक आहे. कारण नगरपालिकेतील राजकीय अस्थैर्य हा एक वेगळा विषय आहे. महत्त्वाचे निर्णय घेणारी स्थायी समितीच सध्या नगर पालिकेत अस्तित्वात नसल्यामुळे नगरपरिषद अधिनियमातील तरतुदीनुसार घेतलेला ठराव बदलविण्यासाठी तीन महिन्यांची वाट पाहावी लागते. मात्र, व्यापाऱ्यांना मिळालेल्या नोटीसमध्ये थेट यावर्षीच्या नोव्हेंबरअखेर दुकाने रिकामी करण्याची ताकिद देण्यात आली आहे. यावरून व्यापाऱ्यांच्या हिताचा ठराव नोव्हेंबरच्या आधी नगरपरिषद घेईल काय, हा लाखमोलाचा प्रश्न आहे. माजी नगराध्यक्ष मंजूषा लोळे व रमेश गौर यांच्या कार्यकाळात सन २००३ ते २०१२ पर्यंत नगरपालिकेने चार ठराव घेऊन बाजारपेठेतील मंदी आणि व्यावसायावरचे आर्थिक सावट लक्षात घेऊन भाडेवाढ रद्द केली होती. हे ठराव सध्याच्या कार्यवाहीमुळे वाया गेलेत काय, हा सुध्दा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.