शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपअभियंता कार्यालयात अस्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 22:56 IST

महावितरणचे स्थानिक उपअभियंता कार्यालय अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नवी इमारत आकारास आली असताना दुसरीकडे या कार्यालयात मूलभूत सुविधांची वाणवा असल्याने ग्राहकांची परवड होत आहे. विद्युत देयके भरण्यासाठी एकखिडकीवरील एक कर्मचारी वगळता येथे अन्य कर्मचारी फारसे फिरकत नाहीत.

ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : दर्यापुरातील कोट्यवधींची इमारत धूळ खात

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : महावितरणचे स्थानिक उपअभियंता कार्यालय अस्वच्छतेच्या गर्तेत अडकले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून नवी इमारत आकारास आली असताना दुसरीकडे या कार्यालयात मूलभूत सुविधांची वाणवा असल्याने ग्राहकांची परवड होत आहे. विद्युत देयके भरण्यासाठी एकखिडकीवरील एक कर्मचारी वगळता येथे अन्य कर्मचारी फारसे फिरकत नाहीत.इमारतीमध्ये ग्राहक तथा दिव्यांग बांधवांसाठी बैठक व्यवस्थाही नाही. इमारतीच्या आतील भागातील अस्वच्छता संताप आणणारी आहे. कार्यालयाच्या विविध भागात जुन्या, कालबाह्य वस्तूंचा साठा करून ठेवल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. येथे पिण्याच्या पाण्यासह बसण्याची व्यवस्था नसून, स्वच्छतागृहही नाही. याकडे सहायक उपअभियंत्यांनी सोईस्कर दुर्लक्ष चालविल्याचा आरोप होत आहे.कचऱ्यात दारुच्या बॉटलमहावितरणच्या या तालुकास्तरावरील कार्यालयाच्या आवारातील कचऱ्यामध्ये बीअर व दारूच्या खाली शिशांचा खच आढळून येतो. काही असामाजिक तत्त्व रात्रीच्या वेळी या इमारतीचा वापर दारू पिण्यासाठी करतात. याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.कार्यालयाच्या आतील परिसरात दारूच्या बॉटल असतील, तर चौकशी करण्यात येईल. ज्या कुण्या व्यक्त ीने ते कृत्य केले असेल, त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कार्यालयाची स्वच्छता राखली जाईल.- चेतन मोहोकार, उपकार्यकारी अभियंता, दर्यापूर