शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

थेट कंपनीमुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:59 IST

शेतकऱ्यांच्या शाश्वत उपन्नात वाढ व्हावी, यासाठी कृषिसमृद्धीद्वारा बागायती शेतकऱ्यांना खरिपासाठी हळदीचा पर्याय उपलब्ध केला. शेतकरी उत्पादक ते थेट कंपनी या साखळीचा अवलंब करीत मंगळवारी २० टनाचा पहिला ट्रक रवाना झाला.

ठळक मुद्देबागायती शेतीमध्ये हळद धरतेय पर्याय : वाहतूक खर्चाचा ५० टक्के अधिभार ‘केम’कडे

अमरावती : शेतकऱ्यांच्या शाश्वत उपन्नात वाढ व्हावी, यासाठी कृषिसमृद्धीद्वारा बागायती शेतकऱ्यांना खरिपासाठी हळदीचा पर्याय उपलब्ध केला. शेतकरी उत्पादक ते थेट कंपनी या साखळीचा अवलंब करीत मंगळवारी २० टनाचा पहिला ट्रक रवाना झाला. यासाठी येणारा ५० टक्के वाहतूक खर्च जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ‘केम’ प्रकल्पातून उपलब्ध केल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.खरीप २०१७ मध्ये सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशीवर बोंड अळीचा अटॅक झाल्याने हातचे पीक गेले. कृषी विभागाद्वारा पर्यायी पिकाची शिफारस नाही. अशा परिस्थितीत अचलपूर तालुक्यात कृषिसमृद्धी या शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांनी ‘सेलम’ या हळदीच्या वाणाची लागवड केली, हळदीला फारसे खत वा कीटकनाशकांची आवश्यकता नसल्याने उत्पादन खर्चदेखील कमी आला.दरम्यान, जळगाव तेथील एका उत्पादक कंपनीद्वारा या शेतकरी कंपनीशी करार झाला. या उद्योगाला रोज १०० टन हळद हवी असते. खासगी बाजारात १० ते ११ रुपये प्रतिकिलो अशी मागणी असताना शेतकºयांशी १२ रूपये किलो या भावाने करार करण्यात आला. मंगळवारी शेतकरी उत्पादकांचा पहिला हळदीचा २० टनाचा ट्रक जळगावला रवाना झाला. अचलपूर येथील तहसीलदार निर्भय जैन यांनी या ट्रकला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यासाठी येणाºया वाहतुक खर्चासाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी कृषिसमुद्धी प्रकल्पामधून ५० टक्के निधी देण्याची सहमती दर्र्शविल्यामुळे शेतकºयांच्या वाहतूक खर्चात बचत झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.ओल्या हळदीला १२ रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. या हळदीवर प्रोसेसिंग करण्याची गरज नाही. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने यापासून पे्ररणा घेऊन आणखी शेतकरी समोर येतील. वाहतूक खर्चासाठी ‘केम’मधूून ५० टक्क्यांची तरतूद करण्यात आली.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी