शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

भूमिअभिलेखमध्ये 'डिजिटलायजेशन' आरंभ

By admin | Updated: February 2, 2015 22:56 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील १२५ वर्षापूर्वीच्या अर्थात ब्रिटिशकालिन कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजिटलायजेशनची

नवा प्रयोग : पहिल्या टप्प्यात पाच तालुक्यांचा समावेशअमरावती : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत येथील भूमिअभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील १२५ वर्षापूर्वीच्या अर्थात ब्रिटिशकालिन कागदपत्रांचे स्कॅनिंग व डिजिटलायजेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मिळून तब्बल पाच हजार दस्तऐवजांचे पानांकन करण्यात व्यस्त आहेत. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये काही वर्षांपूर्वी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. या ई-अभिलेखी प्रकल्पाची आता अमरावती जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात अमरावती, भातकुली, अचलपूर, तिवसा व अशा पाच तालुक्यांत हा प्रकल्प राबविला जात आहे. मार्च अखेरपर्यंत या तालुक्यातील जुने व जीर्ण दस्ताऐवज डिजिटलायजेशन केले जाणार आहे. त्यासाठी अमरावती विभागाची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे. खासगी कंपनीमार्फत मोठमोठे स्कॅनर व तांत्रिक साधनांच्या साहाय्याने हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. ब्रिटिश राजवटीत देशात १८३० ते १८७० या कालावधीत पहिली जमीन मोजणी झाली होती. यानंतर हे व्यापक स्तरावरील काम सध्या जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे. कालबद्ध उपक्रमांतर्गत २०१४-१५ आणि २०१५-१६ या दोन्ही वर्षात उपसंचालक भूमिअभिलेख, नगरभूमापन आणि तहसीलस्तरावर हा उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील जमिनींच्या पुनर्मोजणीच्या दृष्टीने सध्या राज्य शासनाने यासाठी पावले उचलली आहेत. त्याचीच आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे भूूमिअभिलेख विभाग अद्ययावत होणार आहे.अधिकार अभिलेखे प्रामुख्याने राहणार डिजिटलभविष्यातील भूमिअभिलेखे, अधिकारी अभिलेखे हे प्रामुख्याने डिजिटल होणार आहेत. जनतेला ते विशिष्ट फी भरुन आॅनलाईन बघता येतील. त्यासाठी जमिनीचा ई-पुनर्मोजणी प्रकल्प राबविणे अनिवार्य असून त्या अनुषंगाने आता या हालचाली सुरू झाल्या आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सध्या ई -मोजणी, ई-चावडी, ई-फेरफार आणि ई-नोंदणी हे चार उपक्रम राबविले जात असल्याचे उपसंचालकांनी सांगितले. दस्तऐवजांचे विविध प्रकारभूमिअभिलेख कार्यालयात टिपण उतारा, प्रमाणित दस्ताऐवज, मोजमाप, गुणकारक बुक, आकार खोड पत्रक, एकत्रिकरण योजना नोंदवही, फिल्डबुक, आकारबंद पत्रक, शेतजमिनीचा गोषवारा आदींचे स्कॅनिंग केले जात आहे.