शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ‘डिजिटल व्हिलेज’ आहे की ‘डस्ट व्हिलेज’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:58 IST

अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा आकस्मिक दौरा केला. येथील अनेक यंत्रणा योग्य रितीने कार्यरत नसल्याचे त्यांना आढळले.

ठळक मुद्देआय सेंटर, पॉस मशीन बंदमेळघाटला अतिरिक्त जिल्हाधिकाºयांची आकस्मिक भेट

श्यामकांत पाण्डेय ।आॅनलाईन लोकमतअमरावती : अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी बुधवारी देशातील पहिल्या डिजिटल व्हिलेज हरिसालचा आकस्मिक दौरा केला. येथील अनेक यंत्रणा योग्य रितीने कार्यरत नसल्याचे त्यांना आढळले.‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले. यानंतर अधिकाऱ्यांनी सावरासावर करण्यासाठी माहिती अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तेथे भेट दिली होती. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी साध्या गाडीत आपल्या सहकाऱ्यांसमवेत हरिसालपर्यंतचा प्रवास केला. येथील प्रकल्पांची माहिती घेतली.हरिसालमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आॅनलाइन सेवा देणारे कंटेनर बंद होते. तसेच सीटीसी व आय सेंटर एकाच ठिकाणी असल्याचे पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. आय केअर सेंटरसाठी आणलेली मशीन धूळ खात असल्याने त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना बोलावले. मात्र प्रभारी चिखलदरा येथे शासकीय कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. येथील डॉ. प्रियंका कंटाळे यांनी आय केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन ई-लर्निंगची माहिती जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.

तपासणी झाली, औषधे मिळाली नाहीपरदेशी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला रुग्णांशी संवाद साधला. त्यांची तपासणी झाल्याचे सांगितले. मात्र ढाकणा येथील जमुना मनोज धांडे या महिलेने औषध मिळाले नाही, अशी तक्रार करताच अतिरिक्त जिल्हाधिकारी अवाक् झाले. त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दच नव्हते.

येथील नेट सेवा व्यवस्थित सुरू नसल्याने पॉस मशीनचा लाभ मिळत नाही. अनेक प्रयत्नानंतरही मशीन दुरुस्त झाली नाही. यामुळे आॅनलाईन व्यवहार करावे तरी कसे. - सईद खान, व्यावसायिक, हरिसाल

हरिसालमध्ये यंत्रणा सध्या प्राथमिक अवस्थेत आहे. यात सुधारणा करण्याची गरज आहे. संबंधित सर्व विभागांना माहिती देण्यात येईल.- खुशालसिंग परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अमरावती

टॅग्स :digitalडिजिटल