शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या वळण रस्ता निर्मिती दर करारात तफावत

By admin | Updated: February 1, 2015 22:47 IST

अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे सांैदर्यीकरण, विस्तारीकरण प्रस्तावित आहे. तत्पूर्वी विमानतळाच्या वळण रस्त्याचे काम हाती घेतले जाणार

अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळाचे सांैदर्यीकरण, विस्तारीकरण प्रस्तावित आहे. तत्पूर्वी विमानतळाच्या वळण रस्त्याचे काम हाती घेतले जाणार असून त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र एकाच रस्त्याच्या निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १३.५० कोटी तर विमानतळ प्राधिकरणाच्या आयसीटीआय या एजन्सीने १० कोटींचे दर ठरविल्याने शासन या प्रकरणी गांभीर्याने विचार करीत आहे. रस्ता निर्मितीची निविदा फेब्रुवारी निकाली काढण्याचे संकेत आहे.बेलोरा विमानतळाचे सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने आयसीटीआय ही एजन्सी विकास कामांसाठी नेमली आहे. बेलोरा विमानतळाच्या विस्तारीकरणात आडकाठी ठरणाऱ्या बेलोरा ते जळू या दरम्यान पावणे चार कि.मी. लांबीच्या वळण रस्त्यााठी लागणारे दर काढण्याची जबाबदारी या एजन्सीला सोपविली. त्यानुसार आयसीटीआय वळण रस्त्यासाठी १० कोटी रुपये खर्च अपेक्षित राहील, असा अहवाल एजन्सीने राज्य शासनाच्या विमानतळ प्राधिकरणाचे सचिव टी.एस.मीना यांना दिला. दुसरीकडे याच रस्त्याच्या निर्मितीसाठी १३.५० कोटी रुपयांचे दरकरार काढून दिले आहे. रस्ता एकच तरीही खर्चाची रक्कम वेगवेगळी यामुळे विमानतळ प्राधिकरण मंत्रालय चक्रावून गेले. नेमकी यात काय गफलत? हे जाणून घेण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाचे सचिव मीना यांनी मंत्रालयात २३ जानेवारी रोजी बैठक घेऊन वळण रस्ता निर्मितीची वस्तुस्थिती जाणून घेतली असल्याची माहिती आहे. मात्र वळण रस्ता निर्मितीत अडथळा येऊ नये, यासाठी फेबु्रवारीत निविदा लावण्याची तयारी प्रशासनाची आहे. हा वळण रस्ता निर्माण करताना रुंदी वाढवून पायी जाणाऱ्यांना स्वतंत्र मार्ग तयार केला जाणार आहे. हा वळण रस्ता अकोला राष्ट्रीय महामार्गावरुन बेलोरा गावाच्या काही अंतरापासून तर जळू या गावानजिक काठला जाणार आहे. वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास त्यानंतर यवतमाळ, हैद्राबाद, पापळ मार्गे अमरावतीत येणाऱ्या वाहनांना या वळण रस्त्यावरुन अकोला राष्ट्रीय महामार्गावर येवून अमरावती गाठावी लागणार आहे. राज्य शासन विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असून बेलोरा विमानतळाच्या विकासाचे भाग्य कधी उजाळणार असा सवाल निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)