शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आपण यांना पाहिलंत का?

By admin | Updated: June 28, 2014 23:18 IST

पद- तलाठी. काम- विविध उपयोगी दाखले देणे. कार्यक्षेत्र- ठरवून दिलेली गाव मुख्यालये. जिल्हाभरातील गावागावांत कार्यरत असलेले बहुतांश तलाठी ऐन पेरणी व शाळा प्रवेशाच्या हंगामात बेपत्ता झाले आहेत.

जिल्हाभरात तलाठी बेपत्ता : विद्यार्थी, शेतकऱ्यांचे हाल, जिल्हाधिकाऱ्यांचे अभयअमरावती : पद- तलाठी. काम- विविध उपयोगी दाखले देणे. कार्यक्षेत्र- ठरवून दिलेली गाव मुख्यालये. जिल्हाभरातील गावागावांत कार्यरत असलेले बहुतांश तलाठी ऐन पेरणी व शाळा प्रवेशाच्या हंगामात बेपत्ता झाले आहेत. आपणास ते कुठेही आढळल्यास कृपया , जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना सूचित करा. आवश्यक दस्ताऐवजांसाठी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना तलाठ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. पीक कर्जासाठी आवश्यक दाखले, फेरफार, सातबारा आदींसाठी तलाठ्यांकडे जावेच लागते. परंतु पहिल्या खेपेत काम झाल्याचा अनुभव कोणीच व्यक्त केला नाही. एकवेळ मंत्रालयातील काम वेळेवर होईल. पण, तलाठी कार्यालय नको रे बाप्पा!अशाच प्रतिक्रिया उमटतात. संपूर्ण जिल्हाभरात शनिवारी ‘लोकमत’चमूने राबविलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून हे सत्य उघडकीस आले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तरी तलाठी कार्यालयात उपस्थित असतील आणि आपले काम होईल, या आशेने हातात पिशवी घेऊन अर्धशिक्षित शेतकरी तलाठी कार्यालयाच्या उंबरठ्याशी पोहोचतात. पण, त्यांची निराशाच होते. सुरूवातीला सामना होतो तो तलाठी कार्यालयातील दलालांचा. १४ तालुक्यांमधील तलाठी कार्यालयांमध्ये रिक्त पदे आहेतच. महत्त्वाचे दस्तऐवज असुरक्षित आहेत. एकाच तलाठ्याकडे अनेक साझ्यांची जबाबदारी असल्याने नागरिकांना एकाच कामासाठी हेलपाटे घ्यावे लागतात. अमरावतीच्या तलाठी कार्र्यालयाची जवळपास अशीच स्थिती आहे. एकाच फेरीत या कार्यालयात तलाठी भेटतीलच याची शाश्वती नाही.