(फोटो कॅप्शन बालकाच्या मृत्यूनंतर काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात आदिवासींनी गर्दी केली होती)
चिखलदरा - नरेंद्र जावरे
: उलटी, हगवण, लागल्याने गंभीर आजारी झालेल्या डोमा गावातील सात वर्षीय मुलाचा शुक्रवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. काटकुंभ आरोग्य केंद्रात त्याला मृत घोषित करण्यात आले. एकाच घरातील सात जण गंभीर आजारी असून त्यांच्यावर चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. परिसरात मातामृत्यू, बालमृत्यू व जलजन्य आजाराने मृत्यू होत आहे. आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे.
आयुष बुधराज बछले (७, रा. डोमा) असे मृताचे नाव आहे. एकाच परिवारातील बुधराज दमड्या बछले (३५), लक्ष्मी बुधराज बछले (३०),रिया बुधराज बछले(१७), निखिल बुधराज बछले (८) दमड्या बछले (५५), नानू दमड्या बछले (५२) व पिंटू तुकाराम सेमलकर (सर्व रा. डोमा) यांना उलटी होऊन अतिसाराची लागण झाल्याने काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात रागेश्री माहुलकर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढील उपचारार्थ चुरणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. मृत आयुष याला ओकारी व हगवणचा त्रास जाणवू लागल्याने गुरुवारी काटकुंभ आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दुपारी २ वाजता बरे वाटल्याने घरी नेण्यात आले. मध्यरात्रीपासून पुन्हा त्याला ओकाऱ्या झाल्याने पहाटे परिवारातील सर्व सदस्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.
बॉक्स
आयुषचा दखान्यात की घरी मृत्यू?
मध्यरात्रीपासून सात वर्षीय आयुष्याला ओकाऱ्या झाल्या पहाटे पाच वाजता गंभीर आजारी झाला त्यामुळे त्याला काका रामदीन पीपरदे यांनी काटकुंभ आरोग्य केंद्रात आणले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी रागेश्री माहुलकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले परंतु दवाखान्यात आयुष्याला दोन इंजेक्शन दिल्या नंतर तो दगावल्या चा आरोप रामदीन पीपरदे यांनी केला आहे त्यामुळे आयुष्य मृत्यू नेमका कुठे झाला त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे
बॉक्स
अतिसार की अन्नातून विषबाधा ,गावात तपासणी सुरू
एकाच परिवारातील सात सदस्य गंभीर आजारी झाल्याने संपूर्ण गावातील पिण्याच्या पाण्यासह रुग्णांची तपासणी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्फत केल्या जात असल्याचे सांगण्यात आले, गावात अतिसार मुळे कुणीच आजारी नसल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे
कोट
गुरुवारी उपचार करून घरी नेण्यात आले त्यावेळेस आयुष्य प्रकृती ठीक झाली होती रात्री पुन्हा त्याला त्रास झाल्याने पहाटे पाच वाजता घरी दगावला दवाखान्यात तपासणी केली असता मृत घोषित केले गावात पाण्याची व इतर रुग्ण आहे का याची तपासणी केल्या जात आहे
रागेश्री माहुलकर
वैद्यकीय अधिकारी
प्रा आ केंद्र काटकुंभ