शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धारवाड येथे अतिसाराचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:19 IST

तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथे ५० वर्षीय इसमाचा पाण्यातून झालेल्या अतिसाराने २८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. लागण झालेल्या अन्य १३ रुग्णांवर तापत्या उन्हात वर्गखोल्यांतच उपचार सुरू असल्याने त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

ठळक मुद्देआरोग्य सेवेची लागली वाट : पाणी नमुना अहवाल नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथे ५० वर्षीय इसमाचा पाण्यातून झालेल्या अतिसाराने २८ एप्रिल रोजी मृत्यू झाला. लागण झालेल्या अन्य १३ रुग्णांवर तापत्या उन्हात वर्गखोल्यांतच उपचार सुरू असल्याने त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, दोन दिवस लोटूनही प्रशासनाकडून पाणी नमुना चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्ह्याची आरोग्यसेवा किती गंभीर, असा सवाल सोमवारी येथे भेट देणाऱ्या आ. यशोमती ठाकूर यांनी केला.धारवाडा गावातील पांडुरंग दशरथ तायवाडे (५०) यांना २८ एप्रिलला अतिसाराची लागण झाली होती. त्यांना प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय १३ जणांना लागण झाली आहे. त्यामध्ये बहुतांश पाहुणे मंडळी आहेत. गावात २८ एप्रिललाच संदीप सोटे यांच्याकडे आयोजित विवाह सोहळ्यात वापरलेल्या घराजवळील विहिरीच्या पाण्यातून हा प्रकार उद्भवला. विहिरीवर १० ते १२ कुुटुंब मोटार लावून पाणी वापरतात. यानंतर कुºहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने गावातीलच वर्गखोलीत उपचार सुरू केला. एका रुग्णाला अमरावती येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.दरम्यान, ३० एप्रिलला आ. यशोमती ठाकूर यांनी गावाला भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. रुग्णांसाठी खाटेची व्यवस्था नसून, त्यांना खालीच चादर टाकून झोपवण्यात येत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाणी तपासणी रिपोर्ट न येणे ही आरोग्य प्रशासनाच्या कारभाराची मोठी शोकांतिका आहे, असेही त्या म्हणाल्या. वर्गखोलीत उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलास मिळण्यासाठी आमदार यशोमती ठाकूर यांनी स्वखर्चाने कुलर उपलब्ध केला.पंचायत समितीचे बीडीओ व यंत्रणा गंभीरतेने घेत नाहीत. गावात पाणीपुरवठ्याला लिकेज असताना ग्रामपंचायत व पंचायत समितीचे दुर्लक्ष आहे. बेपर्वा आरोग्य यंत्रणेमुळे अतिसाराने बळी गेला. प्रचंड उष्णतामानात वर्गखोलीत रुग्ण असल्याने कूलर उपलब्ध केला.- यशोमती ठाकूर,आमदार, तिवसाधारवाड येथे पाणीपुरवठ्याची जलवाहिनी लिकेज आहे. यामधून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याविषयी पत्र दिले. आरोग्य पथक कर्तव्यावर आहे. अतिसार नियंत्रणात आहे.- सुरेश असोलेजिल्हा आरोग्य अधिकारी