शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

‘डायल १०८’ रुग्णवाहिकांद्वारे वर्षभरात १८०० अपघातग्रस्तांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:24 IST

अमरावती : अकोला झोन अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या एक वर्षाच्या काळात ४ लाख ५०४ ...

अमरावती : अकोला झोन अंतर्गत अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या एक वर्षाच्या काळात ४ लाख ५०४ अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये १८०० अपघातग्रस्तांना ‘डायल १०८’ रुग्णवाहिकांद्वारे तातडीने रुग्णालयात पोहचविल्यामुळे जीवदान मिळाला.

कोरोनाकाळात संचारबंदीमुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ फारशी नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत ५० टक्के अपघाताच्या घडल्या. यामध्ये तातडीने उपचार मिळवून देण्यात १०८ रुग्णवाहिकांनी मोलाची कामगिरी बजावल्याची माहिती झोनल असिस्टंट अक्षय देशमुख यांनी दिली. सेवा प्रारंभ केल्यापासून अकोला झोनमधील ६ लाख ४७ हजार ६६९ रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत जिवंत राहण्यास मदत झाली. यामध्ये आरटीए, गर्भवती, कार्डियाक रुग्णांचा समावेश राहिला.

सन २०१४ ते २०२० या कालावधीत वाशिम जिल्ह्यात ७१३०१ रुग्णांना सेवा देण्यात आली. यामध्ये रस्ते अपघाताच्या ५९६१ रुग्णांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ३७ हजार ८५७ रुग्णांना सेवा देण्यात आली. यामध्ये रस्ते अपघातातील ११ हजार १६८ रुग्णांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ६२५ रुग्णांना सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघातातील १० हजार २९२ रुग्णांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख १ हजार ४६६ रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेची सेवा देण्यात आली. यात रस्ते अपघातातील १३३९५ रुग्णांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख २ हजार ४२० रुग्णांना सेवा देण्यात आली. त्यात ५७२५ रुग्ण रस्ते अपघातातील आहेत.

अमरावती जिल्ह्यातील सन २०१९, २०२० मधील झालेले अपघात

महिना वर्षे २०१९ २०२० टक्के

जानेवारी २२५ २०८ ७.६फेब्रुवारी १७३ २७८ ६०.७

मार्च १९४ १६५ १४.९

एप्रिल १८५ ७१ ६१.६

मे २१७ ५९ ७२.८

जून १७८ १६५ ७.३

जुलै १५० १२१ १९.३

ऑगस्ट १६१ ११५ २८.६

सप्टेंबर १२१ १२८ -५.८

ऑक्टोबर १४४ १५६ -८.३

नोव्हेंबर १७१ २०२ -१८.१

डिसेंबर १७७ २१६ -२२.०

कोट

अकोला झोन अंतर्गत २१२ रुग्णवाहिका २४ तास रुग्णांच्या सेवेत आहेत. आमचे डॉक्टर, चालक हे केवळ कोविडयोद्धेच नव्हे तर खरे जीव वाचविणारे देवदूत आहेत.

- डॉ. दीपक उके, विदर्भप्रमुख,

महाराष्ट्र इमर्जंसी मेडिकल सर्व्हिस (एमईएमएस)