शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

नगररचना विभाग बनला धृतराष्ट्र!

By admin | Updated: August 14, 2016 00:04 IST

शहराच्या मध्यवर्ती भागात टोलेजंग इमारती अनधिकृतपणे उभ्या होत असताना महापालिकेचा नगररचना विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे.

आर्थिक हितासाठी लेटलतिफी : अवैध बांधकामाला उधाणअमरावती : शहराच्या मध्यवर्ती भागात टोलेजंग इमारती अनधिकृतपणे उभ्या होत असताना महापालिकेचा नगररचना विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे. सहायक आयुक्त किंवा उपायुक्त, आयुक्तांनी सांगितल्यावरच कार्यालयाबाहेर पडायचे, असा येथील अधिकाऱ्यांचा खाक्या असल्याने शहरात अवैध आणि अनधिकृत बांधकामाला पेव फुटले आहे.आयएमए हॉलनजिकची डागा सफायर ही आठ मजली इमारत अनधिकृत ठरविल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाचे (एडीटीपी) वाभाडे निघू लागले आहेत. महापालिकेकडून डागा सफायरला नोटीस पाठविण्यात आली. मात्र नवसारीनजीकच्या खंडेलवाल यांच्या मालकीच्या भूखंडावर अवैध बांधकाम सुरू असल्यावरही एडीटीपीने तेथे जाऊन त्या बांधकामाला फुटपट्टी लावण्यात स्वारस्य दाखविले नाही. अतिक्रमण विभागाने खंडेलवाल यांच्या मालकीच्या निर्माणाधीन वसाहतीवर हातोडा टाकला होता. त्यानंतर निर्मानाधीन गाळे बांधकामाच्या परवानगीबाबत एडीटीपीशी संपर्क साधण्यात आला. मात्र एडीटीपी अजूनही ढिम्मच आहेत. नगररचना विभागामार्फत महापालिकेत जमा होत असणारी रक्कम व आजची परिस्थिती विचार करण्याजोगी आहे. दरवर्षाला किती प्रकरणे दाखल झाले? मार्गी किती लागले, याचे विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. हजारोवर नागरिक रीतसर परवानगी न घेता बांधकाम सुरू करीत असल्याने महापालिकेचा महसूल बुडत आहे. याशिवाय एडीटीपी विभागाकडून विविध परिसरात बांधकामाची परवानगी देण्यासाठी भेदभाव होत असल्याचीही ओरड केली जात आहे.बांधकाम परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई होते, असा आरोप आता जनसामान्यांतून होऊ लागला आहे. विविध रिक्त पदांमुळेसुध्दा नागरिकांचे काम त्वरित होत नाहीत.ज्यांनी नियमानुसार बांधकाम केले आहेत, अशाच मालमत्ता धारकांना भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात एडीटीपीच्या नाकावर टिच्चून हजारो चौरस फूट बांधकाम अनधिकृत करण्यात आल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्याची कुठलीही माहिती एडीटीपीपर्यंत वेळेत पोहोचत नाही.महापालिकेच्या नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीसाठी संचिका (प्रस्ताव) दाखला केल्या जातात. मात्रतेच बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतपत आहे. परवानगीच्या व्यतिरिक्त अतिरिक्त बांधकाम केले असल्यास ते अनधिकृत ठरवून तशी नोटीस महापालिकेकडून दिली जाते. युक्तिवादासाठी मुदतही दिली जाते. अपवादात्मक स्थितीत दंड आकारून प्रशासन हात वर करते. महफिल असो वा ग्रँड महफिल, या उभय हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड होताच अतिरिक्त बांधकामाचा दंड म्हणून तब्बल दीड कोटी रुपयांची नोटीस संबंधित मालकांना पाठविण्यात आली. त्या नोटीसवरील कारवाई गुलदस्त्यात आहे.(प्रतिनिधी)अधिकृततेच्या मागणीला अधिकाऱ्यांकडून बळग्रॅड महफिल इन सह अन्य ठिकाणचे बांधकाम अनधिकृत ठरवून त्यांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्या दंडाचे आता नेमके काय झाले, याबाबत कुणीही बोलायला तयार नाही, तर अनेकांना सवलत देत प्रशासन व्यापाऱ्यांप्रती किती सकारात्मक आहे. याचा प्रत्यय आणून दिला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडून अनेक दिवसांपासून जे अनधिकृत आहेत ते अधिकृत करुन घेऊन त्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले जावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, नियमांचे खूसपट काढून आर्थिक व्यवहार कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे.