बच्चू कडूंनी वाजविला ढोल : २० युवतींसह ५५ युवकांचा सहभाग परतवाडा : शहरातील युवक आणि युवतींनी एकत्र येऊन मुंबई, पुण्याच्या धर्तीवर ढोल-ताशा पथकाची स्थापना केली. हिंदवी स्वराज्य ढोल ताशा पथकाचे दिमाखदार असा उद्घाटन सोहळा रविवारी रात्री ८ वाजता नेहरु मैदानात संपन्न झाला. अचलपूरचे आमदार बच्चू कडू, मेलघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर, सूर्यकांत जयस्वाल, सरकारी अभियोक्ता भोला चव्हाण, अरुण घोटकर, किशोर कासार, राजा पिंजरकर, सुनील खानझोडे, नीलेश सातपुतेसह आदी मान्यवर उपस्थित होते. गणेशोत्सव, दुर्गोत्सवसह इतर शुभकार्याप्रसंगी मुंबई, पुणे सारख्या बड्या शहरातून ढोल-ताशे पथक मागविण्याची क्रेस मोठ्या प्रमाणात आहे. मोठ्या शहरातून येणारे हे पथक लाखांवर मानधन घेऊन जातात. दुसरीकडे त्यांना बोलविण्यासाठी महिनाभरापूर्वी आरक्षित करावे लागते. आवश्यक त्या दिवशी हे पथक मिळेल याचीसुद्धा श्वावस्ती नसल्याने ढोल-ताशे पथका अभावी विसर्जन मिरवणूकसुद्धा पुढे ढकलण्यात येतात. या सर्व बाबींवर उपाय पाहता, परिसरासह ग्रामीण भागातील हे पहिलं पथक युवकांना उत्साह, रोजगार देण्यासोबत हिंदवी स्वराज्याची कला अवगत करणारे ठरले आहे. (प्रतिनिधी)आमदारांच्या हस्ते पथकाचे उद्घाटनहिंदवी ढोलताशा पथकाच्या उद्घाटन प्रसंगी अचलपूरचे आमदार बच्चू कडू, मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी ढोल आणि ताशे वाजवून उद्घाटन केले आणि त्यानंतर २० युवती,५५ तरुण आणि चिमुकल्यांचा पथकांच्या ढोलताशांचा गजर आकाशात आनंदला. यावेळी शहरातले शेकडो महिला-पुरुष उपस्थित होते.
परतवाड्यात साकारले ढोल-ताशा पथक
By admin | Updated: August 9, 2016 00:05 IST