शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

धारणी मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढणार

By admin | Updated: July 29, 2016 00:20 IST

अमरावती - बुरहाणपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याचे आश्वासन ....

वकील संघाचे पत्र : अखेर बांधकाम विभाग सक्रिय धारणी : अमरावती - बुरहाणपूर मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच ‘स्पेशल ड्राईव्ह’ काढण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणीचे उपविभागीय अभियंता मिलिंद पाटणकर यांनी दिले. शहरातील मुख्यमार्गाची समस्या तत्काळ निकाली काढा अन्यथा तालुका वकील संघाकडून उच्च न्यायालय मुंबईच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देणारे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आले होते. या पत्राच्या अनुषंगाने लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पाटणकर यांनी कळविले. शहराच्या मध्यभागातून अमरावती - बुरहाणपूर मुख्यमार्ग जातो. याच एकमेव मार्गावर प्रमुख व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत. व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर सर्वाधिक दुकानांचा पसारा मुख्य मार्गापर्यंत पसरविला जात आहे. त्यापुढे वाहनांची रीघ व हातठेल्यांची रेलचेल यामुळे शहर अतिक्रमणात तर आहेच. पण मुख्य मार्गसुद्धा पूर्णपणे अतिक्रमणधारकांच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे. अतिक्रमणाचा विळखा इतका वाढता आहे की, २०० मीटरचा ‘नो पार्किंग झोन’ दाबविणारा नामफलकसुद्धा अतिक्रमणधारकांनी व्यापून टाकला आहे. या अतिक्रमणाबाबत तालुका वकील संघाने नुकतेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपंचायत यांचेसह सार्वजनिक बांधकाम विभागसुद्धा पत्र देऊन ही समस्या कायमस्वरुपी मार्गी लावण्याची विनंती करतानाच लवकरच कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला होता. परिणामी याकडे महसूल व पोलीस प्रशासनाकडून तत्काळ बांधकाम विभागाला पत्र देऊन कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार बांधकाम विभागाकडून लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)