आयोजन : एलआयसी, महालक्ष्मी साडीसेंटरचा सहभागअमरावती : लोकमत सखी मंच हे महिलांचे हक्काचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून सखींकरिता नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा भाग म्हणून सखींकरिता लोकमत सखी मंच, भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) व महालक्ष्मी साडी सेंटर, (राजापेठ सुपर मार्केटच्या बाजूला) यांच्या संयुक्त विद्यमाने धमाल दांडिया स्पर्धा आयोजित केली आहे.नवरात्रौत्सवाच्या पर्वावर नवतेज, नवचैतन्य, नव आशा पल्लवीत करणारे असतात. हाच उत्साह द्विगुणित करण्याकरिता आंतरराज्यीय धमाल दांडीया स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची प्रथम फेरी २० आॅक्टोबरला सायंकाळी ४.०0 वाजता होणार आहे. स्पर्धेचे स्थळ टाऊन हॉल, राजकमल चौक, अमरावती हे आहे. प्राथमिक फेरीतील प्रथम बक्षीस ५00१, द्वितीय ३00१, तृतीय २00१ रुपये अशी आहेत. यात प्रत्येक गटाला १५ मिनीट सादरीकरणाचा वेळ देण्यात येईल. त्यात १२ मिनीट प्रत्यक्ष सादरीकरण व ३ मिनीट तयारीसाठी, स्पर्धेदरम्यान संघ गरबा किंवा मडक्यांचा वापर करू शकतो, स्पर्धेदरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यास सखी मंच जबाबदार राहणार नाही. स्पर्धेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. मागील वर्षीच्या विजेत्या संघाला यावर्षी सहयोगी होता येणार नाही. स्पर्धेत लहान मुलांची गरज भासल्यास जास्तीत जास्त दोन लहान मुले ज्यांचे वय १५ वषार्खालील आहे त्यांना सहभागी होता येणार आहे. (उपक्रम प्रतिनिधी)स्पर्धेचे नियम व अटी : स्पर्धेकरिता केवळ ५00 रुपये प्रवेश शुल्क असून प्रत्येक गटात १२ ते १६ स्पर्धकांचा एक संघ असावा. स्पर्धकांनी पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व वयाचा दाखला सोबत आणणे अनिवार्य आहे. स्पर्धकाचे वय १५ वर्षाच्या वर असावे. गटामध्ये स्त्री-पुरुषाचा किंवा दोघांचाही समावेश असला तरीही चालेल. स्पर्धकांनी गाण्याची सी.डी. स्वत: सोबत आणावी तसेच ढोल व संदलचा उपयोग स्पर्धेदरम्यान करता येईल.
सखींकरिता धम्माल दांडिया स्पर्धा आज
By admin | Updated: October 20, 2016 00:16 IST