शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

धामणगावच्या सिमेंट रोडचे पडले तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:56 IST

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील अनेक शहरांत दर्जेदार सिमेंट रस्ते बांधल्याची जाहिरात करणाऱ्या जे.पी.एंटरप्रायझेस या बांधकाम कंपनीचा मुखवटा कसा खोटा आणि फसवणूक करणारा आहे, हे धामणगावच्या तुटलेल्या सिमेंट रस्त्यावरून उघड झाले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या याच कंपनीकडे अमरावती-बडनेरा शहरांतील कोट्यवधी रुपयांची सिमेंट रस्त्यांची कामे आहेत.जे.पी. एन्टरप्रायझेसतर्फे त्यांच्या संकेत स्थळासह विविध जाहिरातींमध्ये दर्जेदार कामाचे ...

ठळक मुद्दे'जेपी'वर फौजदारी केव्हा? : वेबसाईटवर मात्र दर्जेदार रस्त्याचे चित्र

आॅनलाईन लोकमतअमरावती : राज्यातील अनेक शहरांत दर्जेदार सिमेंट रस्ते बांधल्याची जाहिरात करणाऱ्या जे.पी.एंटरप्रायझेस या बांधकाम कंपनीचा मुखवटा कसा खोटा आणि फसवणूक करणारा आहे, हे धामणगावच्या तुटलेल्या सिमेंट रस्त्यावरून उघड झाले आहे. निकृष्ट काम करणाऱ्या याच कंपनीकडे अमरावती-बडनेरा शहरांतील कोट्यवधी रुपयांची सिमेंट रस्त्यांची कामे आहेत.जे.पी. एन्टरप्रायझेसतर्फे त्यांच्या संकेत स्थळासह विविध जाहिरातींमध्ये दर्जेदार कामाचे श्रेय लाटण्यासाठी धामणगाव येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचा दिमाखाने उल्लेख केला जातो. धामणगाव शहरातील सिमेंट रोडचे छायाचित्रही या कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केले आहे. स्वच्छ व अखंड रस्ता या चित्रात दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र धामणगाववासीयांची फसगत झाल्याची स्थिती आहे. धामणगाव अंजनसिंगी हा सिमेंट रस्ता मुदतीपूर्वीच अनेक तुकड्यांमध्ये विभागला गेला आहे. या रस्त्याचा शुभारंभ १९९७ साली करण्यात आला होता. अवघ्या काही वर्षांतच या रस्त्याची शकले पडली.नगरपालिकांतर्गत राज्यभरात बहुदा पहिला सिमेंट रस्ता बांधण्याचा अभिनंदनीय निर्णय धामणगाव नगरपालिकेने २० वर्षांपूर्वी घेतला. तथापि किमान ५० वर्षांपर्यंत सिमेंट रस्त्याचे आयुष्य असल्याचे सांगणाºया 'जे.पी.'ने धामणगावातील तो रस्ता लुटीची संधी समजून निकृष्ट काम केले. जाणकारांच्या मतानुसार, आवश्यक ते लोखंड, दर्जेदार सिमेंट आणि योग्य क्युरिंग न केल्यामुळे रस्त्याचे तुकडे पडलेत. सिमेंट रस्ता हा कुतूहलाचा विषय असतानाच्या काळातच 'जे.पी.' इतके निकृष्ट काम करीत असेल, तर गल्लीबोळात सिमेंट रस्त्यांचा सुळसुळाट असलेल्या काळात ही कंपनी अमरावती शहरात किती निकृष्ट काम करीत असेल; याचा केवळ अंदाजच बांधलेला बरा.तडे आणि भेगाधामणगाव रस्त्यावर लांबीला समांतर तडे गेले आहेत. तडे आरपार असल्यामुळे रस्त्याची लांब शकलेच पडली. रस्ता मध्यभागातून दोन्ही बाजूंनी सरकल्यामुळे भलीमोठी भेग तयार झाली. दिवसेंदिवस ही भेग मोठीच होत आहे. सुमार कामाचा हा दृश्य परिणाम झाकण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने आटोकाट प्रयत्न केला. परंतु, रस्ता विद्रुप होण्याशिवाय त्याचा फारसा उपयोग झाला नाही. बांधकाम अधिकाºयांनी या भेगेत चक्क डांबर भरले. आहे की नाही मज्जा? डांबराचे रस्ते टिकत नाहीत म्हणून सिमेंट रस्त्याचे बांधकाम आणि सिमेंट रस्ता निकृष्ट झाला म्हणून डांबराचे ठिगळ!फौजदारी केव्हा?मुद्दा असा उपस्थित होतो की, जे.पी. एन्टरप्रायझेस मोठ्या दिमाखाने धामगणगावातील दर्जेदार रस्त्याची शेखी मिरवते. हमी कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याचे अनेक तुकडे झालेत. लोकांच्या पैशांच्या या दुरुपयोगाची आणि करारभंगाची गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हे का नोंदविले गेले नाहीत? बांधकाम खात्यांतर्गत चौकशी का केली गेली नाही? संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्याची प्रक्रिया का आरंभली नाही?मुख्य अभियंता साळवे कधी करणार चौकशी?जेपीईने पूर्वी बांधलेल्या धामणगावच्या सिमेंट रस्त्याचे तुकडे पडले. कठोरा सिमेंट रस्त्याला उद्घाटनापूर्वीच तडे गेले. क्युरिंगसाठी हल्लीही चक्क मातीचा वापर सुरू आहे. बडनेरा रस्त्याचे काम निकृष्ट आहे. अमरावती बसस्थानकासमोरील रस्त्याचे क्युरिंगच झाले नाही. जेपीईला कोट्यवधींची देयके तरीही दिली गेली. जेपीईद्वारे उघड लूट सुरू असताना सार्वजनिक बांधकाम खाते 'डोळे मिटून दूध पिणाºया मांजरा'च्या भूमिकेत आहे. मुख्य अभियंता विवेक साळवे हे जेपीईच्या करारबाह््य मुद्यांची चौकशी करणार काय, असा प्रश्न जनसामान्यांचा आहे.नाव मोठे, दर्शन खोटेजेपी एन्टरप्रायझेस या कंपनीने मेट्रो शहरांसह वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अकोला, अमरावती, धामणगाव, काटोल, कामठी या शहरांमध्ये दर्जेदार कामे केल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. 'लोकमत'च्या हाती आलेल्या माहितीनुसार, उल्लेखित शहरांतील कामांचीही स्थिती प्रश्नांकितच आहे.