शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

धामणगाव काटपूर येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

By admin | Updated: November 28, 2015 01:22 IST

मोर्शी तालुक्यातील धामणगाव (काटपूर) येथे स्मशानभूमी व रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे.

अमरावती : मोर्शी तालुक्यातील धामणगाव (काटपूर) येथे स्मशानभूमी व रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. आयुर्वेदिक दवाखान्याच्या बांधकामातही कमी जाडीचा स्लॅब टाकण्यात आल्याने दवाखाना केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात नागरिकांनी मोर्शीच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.गावातील स्मशानभूमीचे बांधकामाचे बेड काँक्रीट कॉलम हे एकाच दिवशी सहा फूट भरण्यात आला. त्याच दिवशी क्युरिंंग न करता त्या कॉलमच्या खड्ड्यात मुरुम न टाकता काळी माती टाकण्यात आली. लगेच दुसऱ्या दिवशी वर बांधकाम करण्यात आले. बांधकामात वापरण्यात आलेली रेती ही मातीमिश्रित असल्याचे आढळून आले. तसेच रस्त्याचे मातीकाम अंदाजपत्रकात ०.४५ मीटरचे दिले असतानाच ०.३० मीटरही करण्यात आले नाही. त्या खोदकामात ८० एमएम बोल्डरऐवजी मुरुम व मोठे मुरुमाचे दगडच टाकण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता चांगला तयार झाला नाही. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यावर आणखी चिखल तुडवीत जाण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे. त्यामुळे कामाची चौकशी होणे गरजेचे झाले आहे.याबाबत सचिव व सरपंच ग्रामपंचायत धामणगाव यांना सांगितले असता त्याने कुठेही तक्रार करा, कुणीच माझे काही वाकडे करू शकत नाही, असे उद्धट उत्तर दिले. अंदाजपत्रकाप्रमाणे त्या जागेवरील साफसफाई व झाडे झुडपे तोडणे व लेव्हल मारण्यात आली नाही. स्मशानभूमी, रस्ता आणि आयुर्वेदिक दवाखान्याच्या बांधकामाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अविनाश सुंदरकर, प्रमोद इंगोले, बाबुराव सुंदरकर, कैलास आकोलकर, प्रमोद वैराळे, नीरज अटाळकर, नीलेश अमृते, आशिष गांजरे, प्रदीप गांजरे, अमोल भुजाडे, दिलीप सुंदरकर, संजय माहोलकर, गजानन अमृते, राधेशाम सुंदरकर, साहेबराव खडसे आदींनी मोर्शी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांचेकडे केली आहे. तसेच मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांनाही देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)