शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव पालिकेला मिळणार सव्वा कोटींचा निधी

By admin | Updated: August 29, 2016 00:02 IST

शहराने विकासाचा दुसरा टप्पा गाठला असताना नगरपरिषद ते शास्त्री चौक रस्त्याचे सौंदर्यीकरण, ...

पालकमंत्र्यांचा पुढाकार : शास्त्री चौक रस्त्याचे सौंदर्यीकरणधामणगाव रेल्वे : शहराने विकासाचा दुसरा टप्पा गाठला असताना नगरपरिषद ते शास्त्री चौक रस्त्याचे सौंदर्यीकरण, बसस्थानकाचे स्थानांतरण, धवणेवाडी रस्त्याचा विकास असा सव्वा कोटींचा भरीव निधी पालिकेला देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.धामणगाव रेल्वे नगरपरिषदेला प्रवीण पोटे सदिच्छा भेट यांनी दिली. त्यावेळी त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी भाजपा नेते अरुण अडसड, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप अडसड, नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, मुख्याधिकारी हरिचंद्र टाकरखेडे यांची उपस्थिती होती. शहराची वाढती लोकसंख्या व बाहेरगावावरून येणाऱ्या वाहनांची वाढत्या वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. म्हणून शास्त्री चौकातील बसस्थानक शिवाजी चौक येथे स्थानांतरण करण्यात येणार आहे. नगरपरिषद ते शास्त्री चौकाचे सौंदर्यीकरण, धवणेवाडी रस्त्याचा विकास आदी कामांसाठी सव्वा कोटी रुपयांचा निधी धामणगाव शहरासाठी देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. सक्षम नेतृत्वाने शहराचा विकास शक्य होणार आहे. धामणगाव शहराला सांस्कृतिक, साहित्यिक असा वारसा आहे. त्याप्रमाणे त्यागाचा इतिहास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य त्या काळात स्व. दादाराव अडसड यांनी केले. संघ कार्यासाठी स्वत:ची ६८ एकर जमीन विक्री केली व सामाजिक कामासाठी हातभार लावला. त्याचप्रमाणे भाजपा नेते अरुण अडसड यांनी त्याग केला आहे. मागील २० वर्षांपूर्वीचे धामणगाव शहर आणि आताचे शहर पाहिले तर या शहराचा विकासाचा वाढता आलेख दिसेल. भाजप नेते अरुण अडसड यांच्या सक्षम नेतृत्वामुळे धामणगाव शहराचा सर्वांगीण विकास झाला असल्याचे पोटे यांनी सांगून आगामी काळात पुन्हा शहर विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे ना. पोटे म्हणाले.कार्यक्रमाला न.प. सदस्य वर्षा काकडे, अमित भोगे, दिलीप सूर्यवंशी, अशोक बुधलानी, सुनीता पाटणे, रमेश साहू, कृष्णा बुटले, अर्चना आठवले, सरिता ठोसर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोहन गावंडे, दर्शन राठी, प्रशांत बदन्नोरे, पं. स. सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष राजू गावंडे, सदस्य सचिन पाटील, वनिता राऊत, रोशन कंगाले, काशीनाथ काकडे यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)