कोविड झालेल्यांना मिळणार कर्ज
धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागासह शहरातील अनेकांना लागण झाली. खासगी रुग्णालयात उपचारामुळे अनेकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेने ग्राहकांसाठी कवच योजना सुरू केली आहे.
धामणगाव शहरातील शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखा येथे शाखा व्यवस्थापक विनायक कुराडे यांनी या बँकेत पगारदार तसेच विविध ग्राहकांचे खाते आहे. त्यांना एक सामाजिक जबाबदारी म्हणून कोरोनाच्या काळात आर्थिक मदत व्हावी म्हणून कोविडमुळे आजारग्रस्त असलेल्या ग्राहकांना व त्यांच्या घरातील सदस्यांना मदतीचा हात देण्यासाठी "कवच" योजना आणली आहे. जे ग्राहक किंवा घरातील सदस्य पती, पत्नी, मुले, आई, वडील, आजी, आजोबा, नातू यांना १ एप्रिल २०२१ नंतर कोरोना बाधित झाले असतील, त्यांच्या कोविड आजाराच्या उपचारासाठी कर्ज मिळणार आहे. सॅलरी पॅकेज खाते असलेले ग्राहक व पेन्शनर. निव्वळ पगारधारक पेन्शनधारक या कर्ज योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या ग्राहकांना तथा कुटुंबांना कोरोणाची लागण झाली, त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल बँकेत देणे गरजेचे असून, अधिक माहितीसाठी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भारतीय स्टेट बँक कृषी विकास शाखेचे व्यवस्थापक विनायक कुराडे यांनी केले आहे.