शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतूनच गावाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:34 IST

राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले.

ठळक मुद्देपोपटराव पवार : दत्तक गाव योजना कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंतांचा विचार ग्रामगीतेच्या माध्यमातून जगात पोहोचला पाहिजे. गावाचे नियोजन व सहभाग ग्रामगीतेत सांगितल्याप्रमाणे केल्यास आदर्श गावाची निर्मिती प्रत्येक गावात होऊ शकते, असे प्रतिपादन आदर्श गावाचे शिलेदार पोपटराव पवार यांनी येथे केले. सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवात ‘ग्रामगीताप्रणित आदर्श गावांची यशोगाथा’ या विषयावर पोपटराव पवार यांची मुलाखत सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांनी घेतली. यावेळी अभिनेत्री श्रेया बुगडे उपस्थित होत्या. ‘चला हवा येऊ द्या’च्या या जोडीने मुलाखत खुमासदार केली.व्यासपीठावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे, आदर्श ग्राम देवगाव येथील गजानन येवले, राजस्थान रॉयल्स क्रिकेट संघाचे व्यवस्थापक रोमी भिंडर, कॉर्पोरेट प्रशिक्षक सुमंत टेकाडे, अविनाश काकडे, अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, उपसर्वाधिकारी लक्ष्मण गमे, प्रचारप्रमुख दामोदर पाटील, कार्यकारी सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुडे, दिलीप कोहळे, घनश्याम पिकले, भानुदास कराळे, विलास साबळे, सूर्यप्रकाश जयस्वाल उपस्थित होते.विकासाची मानसिकता नसणे हीच खरी समस्या आहे. दत्तकग्राम योजना कुचकामी असून, गावकऱ्यांचे सहकार्याऐवजी अनुदान कुठे मिळेल, याकडेच लक्ष लागते. त्यामुळे सरकारने सगळं केलं पाहिजे, ही भावनादेखील वाढीस लागते. ज्या जिल्ह्यात दारूबंदी केली आहे, त्याच जिल्ह्यात सर्वात जास्त दारू विकली जाते. त्यामुळे दारूबंदी करावयाची असल्यास महिलांच्या सक्रिय समावेशाची आवश्यकता आहे. ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केले असून, ग्रामगीतेच्या आचरणातून या देशातील समस्या सुटू शकतात, असे पवार म्हणाले.आज ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभराष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात २८ आॅक्टोबरला सकाळी ९ ते ५ या वेळेत ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संमेलन व ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन प्रदीप विटाळकर व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर करतील. पहाटे सामुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर दिलीप कोहळे चिंतन व्यक्त करतील. एकनाथ राऊत यांचे ग्रामगीता प्रवचन करतील. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी चिंतन प्रस्तुत करतील. रात्री ८.३० पासून अनुक्रमे ज्ञानेश्वर महाराज वाघ व उद्धवराव गाडेकर यांचे कीर्तन होणार आहे.ओमेश्वरी बंडचा सत्कारकार्यक्रमात विद्यापीठात इंग्रजी विषयात सुवर्णपदकाची मानकरी ओमेश्वरी बंड हिचा प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार करण्यात आला. अमरावती येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य महाविद्यालय व महात्मा फुले महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंतांची सुरेल भजने गाऊन वाहवा मिळविली. संचालन मानवछात्रालयाचे अधीक्षक अमोल बांबल यांनी केले.