शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त आराखड्यातून शेंडगाव, नागरवाडी अन् वलगावचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:14 IST

अमरावती : संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान शेंडगावबरोबरच त्यांची कर्मभूमी ऋणमोचन, नागरवाडी, वलगाव (अमरावती) येथेही संयुक्त आराखड्यातून विकासकामे ...

अमरावती : संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान शेंडगावबरोबरच त्यांची कर्मभूमी ऋणमोचन, नागरवाडी, वलगाव (अमरावती) येथेही संयुक्त आराखड्यातून विकासकामे पूर्ण केले जातील. तेथे निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी शेंडगाव येथे दिली.

श्री संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या शेंडगाव या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ना. ठाकूर बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे, आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, माजी आमदार रमेश बुंदिले, बाळासाहेब हिंगणीकर, हरिभाऊ मोहोड, सुधाकरराव भारसाकळे, गाडगेबाबा मिशनचे मधुसूदन मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.

विकास आराखड्यात नियोजित कामांसह इतरही आवश्यक कामांचा समावेश केला जाईल. संत गाडगेबाबांची कर्मभूमी असलेल्या सर्व गावांचा संयुक्त आराखड्यातून विकास करण्यात येईल. संत गाडगेबाबांनी मानवतावादाची शिकवण दिली व अंधश्रद्धा नाकारल्या. ते थोर कर्मयोगी होते. त्यामुळे आपणही बाबांची खरी शिकवण अंगीकारली पाहिजे व पूजा अर्चा आदी टाळून कृतीवर भर दिला पाहिजे. संत गाडगेबाबा मिशनमध्ये सदस्यपद मिळणे हा आपल्यासाठी सर्वोच्च बहुमान आहे, असेही पालकमंत्री म्हणाल्या.

बॉक्स

१८.६३ कोटींतून १० महिन्यांत कामे होणार

विकास आराखड्यात १८.६३ कोटी निधीतून धर्मशाळा बांधकाम, श्री संत गाडगेबाबा स्मृती भवन, बहुउद्देशीय सभागृह, न्याहारी भवन, आर्ट गॅलरी, ग्राम सफाई अभियान प्रशिक्षण केंद्र, विद्युतीकरण, सिमेंट रस्ते, घाटाचे बांधकाम, प्रसाधनगृह आदी कामांचा समावेश आहे. १० महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.