शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय वस्तीच्या विकास, २८८ कोटींच्या आराखड्यावर शिक्कामोर्तब

By जितेंद्र दखने | Updated: February 15, 2024 22:26 IST

समाज कल्याण : ग्रामीण भागातील २३६४ वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार

जितेंद्र दखने/ अमरावती : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सन २०२३-२४ ते २०२७-२८ अशा पाच वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात मागासवर्गीय वस्तीमधील विविध कामांसाठी सुमारे २८८ कोटी २८ लाख ९२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. सदर आराखड्याला प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे.त्यामुळे आगामी पाच वर्षात जिल्ह्यातीलग्रामीण भागात असलेल्या २ हजार ३६४ मागासवर्गीय वस्त्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास करणे या योजनेअंतर्गत वरील पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये करावयाच्या विकासकामांचा कृती आराखडा सीईओ तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनात तयार करून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत येथील प्रादेशिक उपायुक्तांकडे मान्यतेसाठी सादर केला हाेता. या आराखड्यावर दोन दिवसांपूर्वीच समाजकल्याण उपायुक्तांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या मागासवर्गीय वस्त्यामधील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.८४१ ग्रामपंचायतीत विकासकामेमंजूर करण्यात आलेल्या आराखड्यानुसर जिल्हा परिषदेच्या ५९ गटातील तसेच ८४१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील सुमारे २ हजार ३६४ मागासवर्गीय वस्त्यांमध्ये आगामी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये विकासकामे प्रस्तावित केलेली आहेत. त्यानुसार संबंधित गावांतील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विविध प्रकारची विकासाची कामे करण्यात येणार आहेत.अशा आहेत प्रस्तावित कामेजिल्ह्यातील ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये आगामी पाच वर्षांत करावयाच्या विविध विकासकामांचाा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्याकरिता संबंधित मागासवर्गीय वस्त्यांमध्ये समाज मंदिर सभागृह, अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, पाणीपुरवठा नाल्या, पेव्हर ब्लॉक, मलनि:सारण, वीजपुरवठा आणि विकासकामांचा समावेश आहे.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील वस्तीचा विकास योजनेत आगामी पाच वर्षांत जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये करावयाच्या विकासकामांच्या कृती आराखड्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार आराखड्यातील प्रस्तावित मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकासाची कामे करण्याचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. - राजेंद्र जाधवर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती