शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या जमातींच्या वस्ती, तांड्यांचा होणार विकास; दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर प्राथमिक सोईसुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 16:49 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी आजही भटक्या जमातीच्या अनेक जाती- जमाती भटकंती करून स्थलांतरीत स्वरुपाचे जीवन जगतात. त्यांच्या वस्ती, तांड्यांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक तांडा, वस्ती, सुधार योजनेची मुहूर्तमेढ रोवली असून, दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती : पोटाची खळगी भरण्यासाठी आजही भटक्या जमातीच्या अनेक जाती- जमाती भटकंती करून स्थलांतरीत स्वरुपाचे जीवन जगतात. त्यांच्या वस्ती, तांड्यांमध्ये प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने वसंतराव नाईक तांडा, वस्ती, सुधार योजनेची मुहूर्तमेढ रोवली असून, दलित वस्ती सुधार योजनेच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे.          लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी आदी भटक्या जमाती समूहाच्या तांडा, वस्त्यांमध्ये आजही  गरीबी हे कायम दु:खणे आहे. येथे प्राथमिक सोईसुविधांचे तीनतेरा वाजलेले आहे. शिक्षण, आरोग्य, राहणीमान अशा सर्वच आघाड्यांवर भटक्या जमाती मागे असल्याचे एका सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. त्यामुळे अनुसूचित जातीच्या वसाहतीत ‘दलित वस्ती सुधारणा योजना’ लागू झाल्यानंतर नवबौद्ध, अनुसूचित जाती संवर्गातील वस्त्यांचा झपाट्याने विकास झाल्याने या योजनची फलश्रृती पुढे आली आहे. भटक्या जमातीच्या तांडे, वस्त्यांचा विकास झाल्यास त्यांची कायमची भटकंती थांबेल, यासाठी विमुक्ती जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी वसंतराव नाईक तांडा, वस्ती सुधार योजना लागू होणार आहे. तांडा, वस्तीच्या विकासासाठी जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. तांडा, वस्ती सुधार योजनेतंर्गत पायाभूत सुविधांबाबतचे कामे ही ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या मदतीने करावी लागणार आहे. भटक्या जमातीच्या वस्ती, तांड्यांमध्ये आजपर्यत कोणतेही विकासकामांचा लाभ मिळाला नाही, अशांना प्राधान्यक्रम देणे अनिवार्य असेल.

असे मिळेल अनुदानभटक्या जमातीचे तांडा, वस्त्यांचा विकासासाठी शासनाने अनुदानाची रक्कम निश्चित केली आहे. लोकसंख्येच्या निकषावर अनुदान मिळणार आहे. यात ५० ते १०० लोकसंख्येसाठी चार लाख, १०१ ते १५० लोकसंख्या सहा लाख तर १५१ पेक्षा अधिक लोकसंख्येसाठी १० लाख रुपयांचे अनुदान मिळेल.

ही करावे लागतील कामेविद्युतीकरण, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, शौचालये, समाजमंदिर, वाचनालये, मुख्य रस्त्यांची जोडणी. विकास कामे झाल्यानंतर तांडा, वस्ती सुधार योजनेतंर्गत फलक लावणे अनिवार्य राहील.

टॅग्स :Amravatiअमरावती