शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

सर्वांच्या सहकार्याने विकास करु

By admin | Updated: December 27, 2014 22:43 IST

आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आता पालकमंत्रीही झालो त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्वीकारून सगळ्यांना सोबत घेत विकास कामे करणार, अशी ग्वाही राज्याचे उद्योग,

महापालिकेत सत्कार : प्रवीण पोटे यांची ग्वाहीअमरावती : आमदार झालो, राज्यमंत्री झालो, आता पालकमंत्रीही झालो त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे पालकत्व स्वीकारून सगळ्यांना सोबत घेत विकास कामे करणार, अशी ग्वाही राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.महापालिकेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित सत्काराप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर चरणजित कौर नंदा तर सत्कारमूर्ती राज्याचे नगरविकास, गृह, संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे मंचावर उपस्थित होते. प्रमुख अतिथी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुनील देशमुख, आयुक्त अरूण डोंगरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, अमरावती जिल्ह्यात मंत्रिपदाचा बॅकलॉग नाही. माझ्या सोबतीला नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील आहेत. महापालिकेच्या उत्तरदायित्वाची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने पाटील यांनी अकोल्यात लक्ष देत असताना अमरावतीकडेही जास्त लक्ष द्यावे, अशी गळ घालणार, असे पोटे म्हणाले. आमदार सुनील देशमुख हे पालकमंत्री, राज्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या विकासकामांपेक्षा चांगले काम करून शहराचा चेहरामोहरा बदलविणार, असे पोटे यांनी आवर्जून सांगितले. महापालिकेत नगरसेवकांना सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे त्याकरिता आयुक्तांनी आपल्या स्तरावर प्रयत्न करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. काही वर्षांपासून ठराविक कंत्राटदारालाच महापालिकेत कामे मिळत असल्याची ओरड आहे. ती थांबवून कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. बाहेरील व्यक्तीला कंत्राट देता कामा नये. अमरावतीला स्मार्ट सीटी बनविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार, असे आश्वासन देत सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासकामे करू अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हिजन असून विदर्भ विकासाच्या बाबतीत जबरदस्त चमकेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे बालहट्ट धरेल महापालिकेत आता अनुदान किंवा योजना आणायच्या असेल तर अटी-शर्तीच्या अधीन राहून मिळेल. महापालिकेत अनेक समस्या आहेत. प्रस्ताव पाठवा त्याचा सकारात्मक विचार होईल. या समस्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे बालहट्ट धरणार, असे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले. शहरालगतच्या छोट्या गावखेड्यांचा ताण महापालिकांवर येत आहे. त्यामुळे अशा गावांच्या विकासासाठी ग्रामपंचायत नियोजन प्राधिकरण मंजूर करण्यात आले आहे. या गावांचा विकास गाव शिवार ते जिल्हाधिकारी असा चालणार आहे. महापालिकेचा कारभार चालविण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे लागेल, नागरिकांना मूलभूत सुविधा देताना उत्पन्नाचे साधने वाढवावे लागतील, असे ते म्हणाले. प्रास्ताविक आयुक्त अरूण डोंगरे, संचालन ज्योती तोटेवार, आभार प्रदर्शन मदन तांबेकर यांनी केले. सत्काराला मिलिंद बांबल, बबलू शेखावत, विलास इंगोले, तुषार भारतीय, दिगंबर डहाके, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, सुनील काळे, अजय गोंडाणे, विनायक औगड, चंदन पाटील, राजू मानकर, तमिजाबी, कांचन ग्रेसपुंजे, चेतन पवार, सुगनचंद गुप्ता, प्रल्हाद कोतवाल, विजय नागपुरे, नुरखाँ, छाया अंबाडकर, रेखा तायवाडे, प्रवीण हरमकर, बंडू हिवसे, राजेंद्र तायडे, प्रशांत वानखडे, मंजुषा जाधव, निर्मला बोरकर, गुंफाबाई मेश्राम, सुजाता झाडे, नंदकिशोर वऱ्हाडे, प्रवीण मेश्राम, अंबादास जावरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)