शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे बिघडतेय हवामानाचे संतुलन

By admin | Updated: March 23, 2017 00:09 IST

शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे.

वृक्षांची कत्तल घातक : मान्सूनवर अवलंबून प्रदेशांना धोका वैभव बाबरेकर ल्ल अमरावतीशहरी तसेच ग्रामीण भागात सध्या अत्यंत निर्दयीपणे वृक्षतोड सुरू आहे. वांझोटा विकास करण्यासाठी जी प्रचंड वृक्षतोड शासकीय यंत्रणा करते, त्याची १० टक्के सुद्धा भरपाई होेताना दिसत नाही. मागील वर्षी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली दोन कोटी वृक्षलागवड योजना काही समाजकंटकांच्या मेहेरबानीमुळे फसलेली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात मृताला अग्नी देण्यासाठी सुद्धा लाकूड मिळेल की नाही, याबद्दल शंका आहे. वृक्षतोडीमुळे हवामानासाठी घिातक आणि भयकंर बदल होत आहेत, त्यामुळे भारतासारख्या मान्सूनच्या कृपेवर अवलंबून असलेल्या देशाचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी सुरक्षित रहावी, असे वाटत असेल तर सर्व नागरिकांनी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. २३ मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून हे संपूर्ण वर्ष ‘ढग’, त्याचे प्रकार आणि हवामानावर होणारा परिणाम यावर विशेष जोर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ढगांचा एक जागतिक ‘अ‍ॅटलास’ बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हवामानाचे महत्त्व हवामानाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे दैनंदिन हवामान आणि दुसरा प्रकार म्हणजे दीर्घकालिन किंवा सरासरी हवामान. हवामानाचे घटक हे सभोवतालच्या भौगोलिक आणि नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. हवामानाच्या कोणत्याही घटकात मानवी हस्तक्षेपामुळे बदल झाल्यास त्या ठिकाणच्या हवामानातही बदल व्हायला सुरूवात होते. विदर्भाच्या हवामानात काही बदल झाल्यास त्याचे परिणाम हजारो किलोमीटर अंतरावरील अमेरिकेलासुद्धा भोगावे लागू शकतात. म्हणूनच युरोप अमेरिकेसारखी प्रगत राष्ट्रे विकसनशिल देशांमधील हवामान किंवा पर्यावरण शाबूत रहावे, यासाठी कोट्यवधींचे अनुदान आणि कर्ज देत असतात. भारत किंवा आफ्रिकेमधील अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये विदेशी पैशांवरच कार्यरत असतात. हवामान बदल आणि त्याचे परिणामएखाद्या ठिकाणचे सरासरी हवामानात काही बदल घडून येतात त्यावेळी तेथील हवामान बदल आहे, असे समजले जाते. जागतिक हवामान बदल संघटनेच्या अभ्यासानुसार जागतिक सरासरी तापमानामध्ये १ डिग्री सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात हवामानात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्याची सुरूवात झाली असून हिवाळा लांबणे, एलनिनो, अवेळी आणि मोठ्या प्रमाणात होणारी गारपीट, हिमालयीन भागात कमी झालेले बर्फवृष्टीचे प्रमाण हे त्याचेच उदाहरण आहेअमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. परंतु दोषींवर कारवाई केली जात नाही. शिवाय झाडे वाचविण्यासाठी शासकीय यंत्रणाही विशेष प्रयत्न करताना दिसून येत नाही. अशीच स्थिती राहिल्यास पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे. -अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती