शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई परिसरात कांदा पिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:17 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस-वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कापूस, तूर, सोयाबीन पिकांनी पुरते गारद केले असताना, तीन दिवसांच्या अवकाळी पावसानेदेखील कांदाउत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.तीन दिवसांपासून सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे पिकाचे संरक्षणही करता आले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अद्यापही शेकडो शेतकऱ्यांचा कांदा उघड्यावर पडून आहे. पावसामुळे तो सडण्यास सुरुवात झाली असून, लाखो रुपयांच्या नुकसानाचा सामना करावा लागणार असल्याची चिंता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.नांदगावपेठमध्येही नुकसानदोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे नांदगावपेठ येथील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. संत्रा, कांदा आणि लिंबूच्या पिकांची पडझड झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. रामकृष्ण पोकळे, सुरेश भगत, विलास इंगोले, श्रीकृष्ण मुळे, प्रल्हाद पोकळे या शेतकऱ्यांना वादळाचा फटका बसला. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन धीर द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.कवडीमोलभावात विकला जातोय कांदाशेतकऱ्यांचा कांदा निघण्यापूर्वी बाजारात येण्यापूर्वी त्याचे भाव तेजीत असतात. मात्र, बाजारपेठेत नवीन कांदा विकायला येताच दर पडतात. त्यात आता लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद आहेत. त्यामुळे कांदा चार ते पाच रुपये किलो दराने विकला जात आहे. शहरातील बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी आपला माल विकू शकला नाही. अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यावर नांगर फिरविला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.विक्रीवर परिणामकांद्याची लिलाव प्रक्रिया बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीची साधने व मालाची वाहतूक कमी झालेली असल्याने विक्रीवर परिणाम दिसून येत आहे.कांद्याला लागली सडकांदा काढण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही शेतामध्ये उघड्यावरच पडून आहे. गेल्या तीन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा सडायला सुरुवात झाली आहे.

टॅग्स :agricultureशेती