शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

20 हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी; 369 घरांना क्षती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले. चांदूर बाजार वगळता इतर सर्व तालुक्यात घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार २० हजार हेक्टर शेती खरडून गेली, तर ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अतिवृष्टीने शेतात जाण्यासाठी मार्गही गवसत नाही, असे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पाच दिवसातील जोरदार पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, केळी, संत्रा आदी प्रमुख पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे नुकसान झाले. चांदूर बाजार वगळता इतर सर्व तालुक्यात घरांची पडझड झाली. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार २० हजार हेक्टर शेती खरडून गेली, तर ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी नऊ घरे पूर्णत: पडली असून ३६० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, अतिवृष्टीने शेतात जाण्यासाठी मार्गही गवसत नाही, असे चित्र आहे. दुसरीकडे विमा कंपन्यांनी भरपाईसाठी ७२ तासांच्या आत पंचनामे सादर करण्याचे फर्मान जारी केल्याने विमा काढूनही शेतकरी विम्यापासून वंचित राहतील.

सहा तालुक्यांना फटकाशेतीचे सर्वाधिक नुकसान दर्यापूर तालुक्यात झाले. या तालुक्यातील ५५५ हेक्टरमधील पीक बाधित झाले. त्याखालोखाल १२० हेक्टर शेती पिके धामणगाव रेल्वे तालुक्यात खराब झाली असून, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ९२, वरूड ७८, मोर्शी २० आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १५ हेक्टरमधील शेती पिके खराब झालीत. अशाप्रकारे जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील २० हजार हेक्टरमधील पिके खराब झाली.

१२१ गावांमध्ये कहरपाच दिवसाच्या संततधार पावसाने जिल्ह्यातील १२१ गावांमध्ये कहर केला. धामणगाव रेल्वे, भातकुली आणि तिवसा तालुक्यातील अनुक्रमे २७, २३ आणि २२ गावांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे अनेक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. यामुळे ३६९ घरांची पडझड झाली. यापैकी अमरावती व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन, वरूड, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील प्रत्येकी एक अशाप्रकारे नऊ घरे पूर्णत: कोलमडली. ३६० घरांना अंशत: फटका बसला आहे.

अंशत: फटका बसलेले हे आहेत तालुकेअंशत: फटका बसलेल्यांमध्ये सर्वाधिक ८७ घरे तिवसा तालुक्यातील आहेत. भातकुली तालुक्यात ७६, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ५१, अमरावती तालुक्यात ४९, तर दर्यापूर तालुक्यातील ३३ गावांचा समावेश आहे. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात एक व्यक्ती वाहून गेला. मृत व्यक्ती अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे.

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती