शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही गुटखाबंदी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्ह्याचा आढावा घेताना अवैध दारू आणि गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला निरूत्तर केले होते. विशेषत: अन्न व औषध प्रशासन विभाग गुटखा तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ना. ठाकूर यांनी ठेवला होता. मनुष्यबळ नसल्याच्या नेहमीच्या रडगाण्यावर पालकमंत्री संतापल्या. कारणे नकोत, जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झालाच पाहिजे, अशी तंबी त्यांनी एफडीएला दिली.

ठळक मुद्देप्रशासनाचे गुटखाविक्रेत्यांना अभय!

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गत आठवड्यात जिल्ह्यातून गुटखा हद्दपार करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, तेव्हापासून यात काहीही सुधारणा झालेली नाही, उलट ‘पैसे द्या अन् माल घ्या’ असे गुटखा विक्रीचे वास्तव जिल्हाभरात आहे.पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्ह्याचा आढावा घेताना अवैध दारू आणि गुटखा विक्रीच्या मुद्द्यावरून प्रशासनाला निरूत्तर केले होते. विशेषत: अन्न व औषध प्रशासन विभाग गुटखा तस्करी रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ना. ठाकूर यांनी ठेवला होता. मनुष्यबळ नसल्याच्या नेहमीच्या रडगाण्यावर पालकमंत्री संतापल्या. कारणे नकोत, जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झालाच पाहिजे, अशी तंबी त्यांनी एफडीएला दिली. मात्र, त्यानंतरच्या १० दिवसांत गुटखा विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन वा पोलिसांनी नियोजनच केले नाही, हे वास्तव दोन्ही विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे दिलेल्या वक्तव्यात आढळले आहे. गुटखा विक्री रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन असो वा पोलीस यंत्रणा किती सजग आहे, हेही यातून दिसून येते. गुटखा विक्री आणि तस्करी रोखण्याचे पालकमंत्र्यांच्या आदेशाचे काटेकारेपणे पालन केले जात नाही. त्यामुळे गुटखा तस्करीत प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हात असल्याच्या चर्चा खºया का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.शहरात कोणत्याही ठिकाणी गुटखा उपलब्ध आहे. राज्यात गुटखाबंदी असताना तो कोठून, कसा येतो, याचे सगळे मार्ग पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांना माहिती आहे. मात्र, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ यातून हा व्यवसाय फोफावला आहे. गुटखा विक्री बंद करावी, यासाठी इंडियन मुस्लिम एकता मंचचे अब्दुल रफिक यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालकांकडे तक्रार दिली आहे.मध्य प्रदेशातील सावर्डीतून येतो ‘बाजीराव’हल्ली बाजीराव या गुटख्याची धूम आहे. अल्पवयीनही हा गुटखा बाळगतात. या गुटख्याचा मालक बडनेºयातील रहिवासी गुटखा माफिया आहे. विदर्भात गुटखा व्यवसायाचे जाळे सर्वदूर पोहचविण्यासाठी या माफियाला पोलिसांचे बळ मिळत असल्याची माहिती आहे.बडनेरा, बेलोरा गोदामात गुटखा साठवणबडनेरा येथील सिंधी कॅम्प आणि अकोला मार्गालगतच्या बेलोरा येथील गोदामात कोट्यवधीच्या गुटख्याची साठवण केली जात असल्याची माहिती आहे. अवैध गुटखा व्यवसायाला ग्रामीण, शहर पोलिसांचे अभय आहे. पोलीस विभागातील बड्या अधिकाºयांचे गुटखा माफियांसोबत ‘मधुर’ संबंध आहेत. विदर्भात विविध ब्रँडच्या नावे विकल्या जाणाºया गुटख्याच्या तस्करीचे केंद्र हे बडनेरा व इतवारा बाजार आहे. जिल्हाभरात गुटखा विक्रीसाठी जाळे पसरले आहे. गावखेड्यात गुटखा पोहचविण्यासाठी १५ ते २० चारचाकी वाहने वापरली जातात.बनावट ‘हॉट’ची निर्मितीकेरळ येथे उत्पादित होणारा ‘हॉट’ नामक गुटखा हा अमरावती शहरात बनावट विकला जात आहे. या ‘हॉट’ गुटख्याची निर्मितीसुद्धा बडनेऱ्यातील माफियाकडून करण्यात येत आहे. नजर, विमल, पन्नी नजर, सात-सात, तलब, ९ हजार आदी गुटखा ब्रॅन्ड मध्यप्रदेश आणि अमरावती जिल्ह्यातच तयार केले जातात.नागझिरी, पांढरी येथे कारखानाअकोला मार्गालगतच्या नागझिरी व भातकुली ते बडनेरा मार्गावरील पांढरी येथील एका शेतात गुटखा निर्मितीचा कारखाना आहे. या दोन्ही ठिकाणावरुन तयार होणारा ‘९ हजार’ गुटखा हा संपूर्ण विदर्भात पोहचविला जात असल्याची माहिती आहे. बडनेरा येथे गुटखा माफियाचे वास्तव असून, गुटखा व्यवसायाची उलाढाल दररोज दोन ते तीन कोटींची आहे.लालखडी, इतवारा बाजारातून विक्र ीअमरावती शहरात सुमारे दोन हजार लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून गुटखा विक्री होते. त्यांना स्थानिक लालखडी येथील इमरान आणि इतवारा बाजारातील जब्बार नामक ठोक व्यापारी गुटखा पुरवित असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वे स्थानक चौकातील एका व्यावसायिकाकडे खुलेआम ठोक गुटखा विकल्या जातो, तर जिल्ह्यात गुटखा विक्रीत जावेदचा बोलबाला आहे.पालमंत्र्यांनी जिल्ह्यातील गुटखा विक्री बंद करण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाला आदेश दिले आहेत. मात्र, त्यांच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. या विभागाला योग्य ते मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत.- संजयकुमार बाविस्करपोलीस आयुक्तपालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशानुसार अंमलबजावणीसाठी विशेष पथक गठित करण्यात येणार आहे. विभागातील अन्न व औषध निरीक्षकांची चमू तयार करून गुटखा विक्री रोखण्यासाठी नियोजन सुरू आहे. तोकडा कर्मचारी वर्ग हा सर्वात मोठा अडसर ठरत आहे.- सुरेश अन्नपुरेसहआयुक्त, एफडीए

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी