शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीजी'च्या परीक्षार्थींना 'नेट'च्या परीक्षेत बसायला 'केजी'च्या विद्यार्थांचा डेस्क

By उज्वल भालेकर | Updated: June 18, 2024 21:25 IST

के.के. कॅमब्रीज परीक्षा केंद्रावरील प्रताप, परीक्षार्थींमध्ये संताप

अमरावती: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी युजीसी नेट- २०२४ परीक्षा १८ जूनला पार पडली. परंतु शहराबाहेर असलेल्या के के कॅमब्रीज परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींचे मात्र बसण्याचे चांगलेच हाल झाले. या केंद्रावर बसण्यासाठी 'केजी'च्या विद्यार्थ्यांचे डेस्क परीक्षार्थींना देण्यात आले होते. त्यामुळे तीन तास या छोट्याशा डेस्कवर बसून पेपर देतांना विद्यार्थांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

ज्युनिअर रिसर्च फेलाेशिप तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापक पदावर नियुक्तीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण हाेणे गरजेचे आहे. तसेच युजीसीने जून २०२४ पासून विविध ८३ विषयांमध्ये पीएच.डी ला प्रवेश घेण्यासाठी नेट परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यामुळे दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) मार्फत ही परीक्षा घेतली जाते. मागीलवर्षी ऑनलाइन परीक्षेदरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे दोन तास परीक्षा उशिरा सुरू झाली होती. यावर्षी अशाप्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून १८ जूनला 'नेट'ची परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली. दोन शिफ़्टमध्ये या परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी शेकडो विद्यार्थांना  शहराबाहेर असलेले के के कॅमब्रीज हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यावेळी या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना बसण्यासाठी येथे शिकणाऱ्या 'केजी'च्या विद्यार्थांच्या डेस्कची व्यवस्था केली होती. यावेळी परीक्षार्थींना या छोट्याशा डेस्कवर बसून पेपर कसा सोडवणार असा प्रश्न उपस्थिती करत डेस्क बदलून देण्याची मागणी केली. परंतु डेस्क बदलून मिळणार नाही, तुम्ही या संदर्भात 'एनटीए'ला ऑनलाइन तक्रार नोंदवा असा सल्ला परीक्षा खोलीवर असलेल्या परिवेक्षक यांनी दिला. त्यामुळे तीन तासाच्या या परीक्षा कालावधीत छोट्याशा डेस्कवर बसताना होणारा त्रास सहन करत विद्यार्थांना परीक्षा द्यावी लागली. एनटीए परीक्षा केंद्र निवडताना संबंधित केंद्रावर बसण्याची व्यवस्था तसेच इतरही सुविधा तपासत नाही का असा प्रश्न आता परीक्षार्थी उपस्थित करत आहेत.

टॅग्स :Amravatiअमरावतीexamपरीक्षा