शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांसाठी तयार केली १७ किलोमीटर ‘पाणेरी’

By admin | Updated: May 13, 2017 00:10 IST

वैशाख वणव्यात तहानेने तडफडून मरणाऱ्या पक्ष्यांना दिलासा मिळावा, म्हणून या ना त्या उपाययोजना केल्या जातात.

चांदूर-पुसदा मार्ग : शहरातील पक्षीप्रेमींचा स्तुत्य उपक्रमचांदूरबाजार : वैशाख वणव्यात तहानेने तडफडून मरणाऱ्या पक्ष्यांना दिलासा मिळावा, म्हणून या ना त्या उपाययोजना केल्या जातात. मनुष्य प्राण्यांसाठी पाणपोया लावल्या जातात. पण, मूक पक्ष्यांचा विचार करून त्यांच्या तृष्णातृप्तीसाठी एक-दोन नव्हे, तर १७ किलोमीटरपर्यंत पाणेरी लावून शहरातील पक्षिप्रेमींनी आगळ्या भूतदयेचा परिचय दिला. चांदूरबाजार ते पुसदा मार्गावरून एक फेरफटका मारला असता या रस्त्यावरच्या प्रत्येक झाडावर मातीच्या गंगोली आणि त्यात थंडगार पाणी दिसून येते. पक्षी पाण्याच्या शोधार्थ येतात आणि या गंगोल्यांमधील पाणी पिऊन तृप्त होतात. शहरातील काही पशुप्रेमींनी हा उपक्रम अविरत प्रयत्नांमधून राबविला आहे. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यामध्ये पशू-पक्ष्यांचा मोठा वाटा आहे. परंतु दूषित वातावरण, झाडांची कमी होत चाललेली संख्या आदी कारणांनी पक्ष्यांची संख्या घटत चालली आहे. पक्ष्यांना जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्याबद्दल सातत्याने जागृतीदेखील केली जात आहे. १७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यात प्रत्येक हिरव्या झाडांवर दोरीने गंगोली टांगल्या आहेत. यात नियमित पाणी भरले जाते. अशा एकूण ७५ गंगोल्या टांगलेल्या आहेत. यात दररोज ताजे पाणी भरण्याची जबाबदारी सुद्धा पक्षीमित्रांनी स्वयंस्फुर्तीने उचलली आहे. वाढत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटत असताना पाण्याच्या थेंबाथेंबाकरिता पक्षी मोताद होत आहेत. कित्येक मृत्युमुखी देखील पडत आहेत. या पार्श्वभूमिवर हा उपक्रम इतरांसाठीदेखील प्रेरणादायी ठरणाराच आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमात राजीव शिंदे, नीलेश माहुरे, राजेश ढवळे, विजय कुऱ्हेकर, अतुल मुळे, संजय राऊत, नीलेश अंबाडेकर, संजय मुळे आदींचा सहभाग लाभत आहे. नागरिकांनी पुढे येण्याची गरज पक्षीप्रेमींनी पुढाकार घेऊन तब्बल १७ किलोमीटर लांब पाणेरी सुरू केली आहे. पक्ष्यांना यातून जीवदान मिळत आहे. परंतु कित्येक ठिकाणी अद्यापही पक्ष्यांसाठी पाण्याची सोय नाही. यामुळे सर्वच नागरिकांनी याकामी पुढाकार घेऊन शक्य होईल तेथे पक्ष्यांसाठी आपल्या परीने पाण्याची सोय करणे गरजेचे आहे.