शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या बक्षिसात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 22:57 IST

चेतन घोगरे ।आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : सण-उत्सव तसेच आपत्कालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पाच कोटींपैकी चार कोटींची बक्षिसे त्वरित वाटप करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या आदेशावरून कार्यवाहीला अद्याप गती मिळालेली नाही.राज्यात २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सण-उत्सव होते. आॅगस्ट महिन्यात मुंबई व ...

ठळक मुद्देचार कोटी मंजूर : राज्य शासनाचा निर्णय, अमरावती आयुक्त कार्यालयाला सर्वांत कमी निधी

चेतन घोगरे ।आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : सण-उत्सव तसेच आपत्कालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना पाच कोटींपैकी चार कोटींची बक्षिसे त्वरित वाटप करण्याचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या आदेशावरून कार्यवाहीला अद्याप गती मिळालेली नाही.राज्यात २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७ या कालावधीत सण-उत्सव होते. आॅगस्ट महिन्यात मुंबई व परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. यावेळी पोलिसांनी वित्तहानी व जीवहानी होऊ न देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. या कामगिरीकरिता पाच कोटी रुपये बक्षीस वितरीत करण्यास राज्याच्या गृहविभागाने मान्यता दिली होती. या अनुषंगाने पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य राखीव पोलीस बल गट १ ते १६ यांना उपलेखाशीर्ष बक्षीस उद्दिष्टाखाली म्हणून चार कोटी रुपये बीडीएस प्रणालीवर उपलब्ध केले.रकमेचे वाटप केव्हा ?गृह विभागाने चार कोटी रुपये मंजूर केले तसेच अपर पोलीस महासंचालकांनी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना ही बक्षीस स्वरूपाची रक्कम दोन महिन्यांपूर्वी त्वरित उपलब्ध करून दिली. तरीही रक्कम वाटपात पोलीस विभागाकडूनच दिरंगाई होताना दिसून येत आहे.मुंबई आयुक्तालयास सर्वाधिक निधीअमरावती आयुक्त कार्यालयाला सर्वात कमी ५,२१,३१७ रुपये निधी, तर पुणे आयुक्त कार्यालयाला सर्वाधिक २,७५,०४,७३१ रुपये निधी प्राप्त झाला. गट क्र.८ मुंबईला सर्वाधिक ३,३१,०८४, तर गट क्र.१६ कोल्हापूरला २,०३,१४० रुपये निधी प्राप्त झाला.पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्रनिहाय निधीवाटपठाणे परिक्षेत्र २,८२,५,१५७नाशिक परिक्षेत्र ३,६७,१,९४६कोल्हापुर परिक्षेत्र ३,९६,५,७१३औरंगाबाद परिक्षेत्र २,१५,२,६०७अमरावती परिक्षेत्र ३,३०,०,५१०नांदेड परिक्षेत्र २,३१,०,५७३नागपूर परिक्षेत्र ४,४३,७,६४८(सर्व आकडे रुपयांत)